प्रतिष्ठा न्यूज

लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील प्रा. डॉ. कणसे, डॉ. जोशी, डॉ. कामिनवार, डॉ. जाधव यांची स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळावर निवड

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : तालुका धर्माबाद येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील प्राध्यापकांची नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध विषयाच्या अभ्यास मंडळावर नामनिर्देशीत सदस्य म्हणून निवड झाली आहे.
त्यामध्ये भौतिकशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य म्हणून- डॉ.कमलाकर कणसे, इलेक्ट्रानिक अभ्यास मंडळ सदस्य-डॉ.योगेश जोशी,रसायनशास्त्र विभाग अभ्यास मंडळ सदस्य-डॉ.नितीश कामिनवार यांची मा.कुलगुरु डॉ.उद्धवराव भोसले यानी नामनिर्देशित प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे. त्याच बरोबर महाराष्ट्र उच्च शिक्षण तंत्रज्ञान विभाग व माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र विभाग संचलित आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून- प्रा.डॉ.प्रभाकर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठ स्तरावर काम करण्यास संधी मिळणे हा आमच्या महाविद्यालयाचा बहुमान आहे.असे उदगार काढत या महविद्यालयातील सर्व नियुक्त प्राध्यापकांचा संस्थेच्या वतीने संस्थेचे सहसचिव- मा.वर्णी नागभूषण साहेब यांनी महविद्यालायाचे प्रभारी प्राचार्या डॉ.पी.सुशीला व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी यांच्या उपस्थिती मध्ये सत्कार केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही दिल्या.💐

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.