प्रतिष्ठा न्यूज

रुग्ण हक्क सनद अंमलबजावणी सद्यस्थितीचा अभ्यास लोक सहभागाने करणार: आरोग्य हक्क समिती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट अंतर्गत रुग्ण हक्क सनद अंमलबजावणी सद्यस्थितीचा (सर्वेक्षण) अभ्यास हे लोक सहभागाने करण्याचा निर्णय आरोग्य हक्क समितीच्या कार्यशाळेत घेण्यात आला.
पाटबंधारे भवन येथे आयोजित कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून, पुणे साथी संस्थेच्या आरोग्य हक्क कार्यकर्त्या शकुंतला भालेराव उपस्थित होत्या. रुग्णालयांच्या करिता केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या रुग्ण हक्क सनद, 15 प्रकारचे दर पत्रकांची माहिती, हॉस्पिटलच्या दर्शनी भागात तक्रार निवारण कक्ष व स्थानिक पर्यवेक्षीय प्राधिकारी याची माहिती लावणे व टोल फ्री नंबर इत्यादी. कायदेशीर रुग्णांच्या अधिकाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. खाजगी व धर्मादाय हॉस्पिटल यांनी शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी व सर्वेक्षणासाठी येणाऱ्या आरोग्य हक्क कार्यकर्त्यांना जनहितार्थ सहकार्य करावे असे आवाहन केले. यावेळी प्रा.शिवाजी त्रिमुखे, अनमोल पाटील, डॉ. परविन इनामदार सुफियान पठाण, राजेश साळुंखे, रमजान खलिफा, सुहास सावर्डेकर, प्रतीक्षा काळे, वैभव चव्हाण, पावेल शेख, योगेश रोकडे, कल्लाप्पा कोळी, हाफिज सद्दाम, शमीम मुल्ला, आसमा मुजावर, रुक्मिणी आंबेकरी, इलियास शेख, एड. संजय पाटील, नाना कनवाडकर स्वप्निल शेडगे इत्यादींच्या सहभागाने तीन अभ्यास गटांची स्थापना करण्यात आली. राम शिंदे, विनोद भाऊ व कौसर व डॉ.राजेंद्र शितोळे, अविनाश गायकवाड यांनी रुग्णांच्या अन्याया बद्दल मत व्यक्त केले .यावेळी शंभर आरोग्य हक्क कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रस्ताविक सचिन आरवाळे व स्वागत बालम मुजावर यांनी केले. दस्तगीर ढवळीकर यांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.