प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उद्यापासून आर.आर.आबा पाटील स्मृति दिनानिमित्त लक्षवेधी व्याख्यानमाला

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहितदादा कल्चरल ग्रुपच्यावतीने तासगाव येथे उद्या दि. २७ ते गुरुवार दि.२९ फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रोहितदादा कल्चरल ग्रुपचे रवी पाटील यांनी दिली.यावेळी पाटील म्हणाले आर. आर .पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व,जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास स्वकर्तृत्वाचा सत्ताकाळात त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले निर्णय राबविलेल्या योजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत.वक्तृत्व आणि कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर वेगळा ठसा उमटविणाऱ्या आर.आर. आबांच्या स्मृती जपल्या जाव्यात या हेतूने रोहितदादा कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित केली आहे.तासगाव येथील रोहितदादा कल्चरल ग्रुपच्यावतीने यंदा लक्षवेधी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे.व्याख्यानमालेचा प्रारंभ उद्या दि.२७ रोजी तासगाव येथील नगरपरिषदेच्या साने गुरुजी नाट्यगृहात सायंकाळी ७ वाजता युवा नेते रोहित पाटील यांच्याहस्ते होणार आहे.शिवचरित्र अभ्यास पश्चिम महाराष्ट्र भूषण पुरस्कारप्राप्त प्रा.डॉ. अरुण घोडके हे ‘असे होते शंभूराजे ‘ या विषयावर पहिले पुष्प गुंफणार आहेत.तहसीलदार रवींद्र रांजणे , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.बुधवार दि. २८ रोजी स्व. आर.आर.(आबा) यांच्या मातोश्री श्रीमती भागीरथी पाटील यांची प्रकट मुलाखत होणार आहे.सुप्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव हे ‘माझा रावसाब ( आबा )’ या विषयावर आईकडून आबांचे वेगळे पैलू उलगडणार आहेत.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले,पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची प्रमुख उपस्थिती आहे.गुरुवार दि. २९ रोजी युवा व्याख्याते व समाजप्रबोधनकार वसंत हंकारे यांचे ‘बाप समजून घेताना ‘या विषयावरील व्याख्यानाने तिसरे आणि अखेरचे पुष्प गुंफले जाणार आहे.यावेळी जेष्ठ विचारवंत प्रा.डॉ. बाबुराव गुरव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ७ वाजता तासगाव येथे साने गुरुजी नाट्यगृहात होणार आहे.
संयोजन रोहितदादा कल्चर ग्रुप तसेच,जिव्हाळा ग्रुप व सर्व रोहित दादा प्रेमी करीत आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.