प्रतिष्ठा न्यूज

युवकांनी गीतेची शिकवण आचरणात आणावी–विश्वविख्यात प्रवचनकार जय किशोरी* अमृतवाणी ऐकण्यासाठी हजारो भाविक भक्तांची अलोट गर्दी

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : मानवाच्या जीवनात नेहमी चढउतार होत असतांना दिसत असतात परंतु जीवनामध्ये सुख ,समाधान आणि शांतता हवी असेल तर युवकांनी, भगवद्गीतेचे अध्ययन पठण करावे गीतेची शिकवण आचरणात आणावी  असे प्रतिपादन जया किशोरी यांनी केले. विश्व विख्यात भागवत कथा प्रवचनकार जया किशोरी,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करणवाल,मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे,यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात झाली.
      त्या भगवान श्रीकृष्ण कथा या विषयावर प्रवचन करताना गुरू गोंविवसिंग मैदान, हिंगोली गेट, नांदेड येथे आयोजित भागवत कथेच्या प्रसंगी अमृतवाणीतून  बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले होते.
        यावेळी जया किशोरी यांचा खासदार प्रताप पाटील, प्रतिभा पाटील, प्रवीण पाटील चिखलीकर ,  प्रणिताताई देवरे,  आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मूर्ती,शाल, श्रीफळ,हार देऊन गौरव करण्यात आला.
          याप्रसंगी भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना जया किशोरी रसाळ,अमृतवाणीतून पुढे म्हणाल्या की, माणसाने नेहमी सत्य बोलले पाहिजे, सत्याचे अनुकरण करावे,  भगवान श्रीकृष्ण यांनी राजकारण केले पण सत्याचीच बाजू घेतली. नेहमी सत्याचाच विजय होत असतो आणि स्वार्थासाठी सुद्धा राजकारण करू नये असेही त्यांनी  याप्रसंगी उपदेश केला. भगवान श्रीकृष्णाने नेहमी सत्याची बाजू घेतली आणि सत्याचाच विजय होत असतो असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कारस्थाने करू नये असे त्यांनी यावेळी सांगितले.
          जया किशोरी यांचे अमृतवाणीतून प्रवचन ऐकण्यासाठी 25  हजारापेक्षा अधिक भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित होते. भक्ताची  अलोट गर्दी उसळली होती.
  त्यांनी यावेळी भजन गाऊन भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.
      याप्रसंगी गुरुवर्य   संत नामदेव महाराज बारूळकर ,संत नराशम महाराज येवतीकर,, संत गोविंद महाराज (पाचलेगावकर मठ  नांदेड) तसेच बाबा बलवत सिंग, जि प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यासह हजारो भाविक भक्त मंडळी उपस्थित होते.कार्यकर्माचे प्रास्ताविक प्रविण पा.चिखलीकर यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.