प्रतिष्ठा न्यूज

वाढते अपघात चिंताजनक बाब आहे : सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर पाटील शिंदे

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.22 :  दिवसेंदिवस जिल्ह्यात वाढत चाललेले अपघात ही चिंतेची बाब आहे.निष्पाप लोकांचे मृत्यू हे चालकाने निष्काळजीपणे वाहने चालविणे आणि रस्त्याचे नियम न पाळणे यांमुळे सर्वात जास्त अपघात होतात असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर पाटील शिंदे यांनी केले. त्या शहरातील वसंत नगर भागातील राजर्षी शाहू विद्यालय व ज्यू काॅलेज येथे बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री बालाजी पाटील हंगरगे हे होते.
कार्यक्रमाचे सुरुवातीला बहुजन प्रतिपालक छ.राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन श्रीमती आशाताई शिंदे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
महालक्ष्मी सेवा भावी संस्था आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे तसेच प्रादेशिक अधिकारी ( आर. टी .ओ.) श्री संदीप निमसे,सहायक इन्स्पेक्टर श्री पंकज कंठेवार, श्री विक्रांत पाटील शिंदे यांचा शाळेच्या वतीने प्राचार्य श्री बालाजी हंगरगे , श्री पंजाबराव सावंत,उपप्राचार्य डॉ.पांडूरंग यमलवाड, जेष्ठ सहशिक्षिका श्रीमती निर्मला खुळे यांनी शाल,श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी सत्काराला उत्तर देतांना सौ.आशाताई शिंदे म्हणाल्या की,विद्यार्थी,पालक यांनी रस्ता सुरक्षा नियमाचे पालन करावे. समाजात जनजागृती करावे.तसेच अधिकारी यांनी जनता आणि वाहन चालक यांचे प्रबोधन करावे. त्यामुळे अपघाताला पायबंद बसतो.लोकाचा जीव वाचतो असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री संदीप निमसे म्हाणाले की,लोकांनी वाहन चालवताना हेल्मेट आणि सिट बेल्ट चा वापर नियमितपणे करावा. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियम प्रात्यक्षिक करून दाखविले,
यावेळी युवा सामाजिक कार्यकर्त्यये श्री विक्रांत पाटील शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.पांडूरंग यमलवाड,क्रिडा शिक्षक टी.एन.रामनबैनवाड,डाॅ.माणिक गाडेकर आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टापरे यांनी केले तर आभार एन.सी.सी.विभाग प्रमुख डॉ.माणीक गाडेकर यांनी व्यक्त केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.