प्रतिष्ठा न्यूज

कर्नल रंगराव यांची राजर्षी शाहू विद्यालयास भेट

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
नांदेड : 52 महाराष्ट्र बटालियन एनसीसी नांदेड चे कर्नल रंगराव यांनी राजर्षी शाहू विद्यालयात सदिच्छा भेट दिली. या भेटीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेटना संबोधीत करताना ते म्हणाले की, छात्र सैनिकांनी एकता आणि अनुशासन जपले पाहिजे आणि एनसीसी युनिफॉर्म हा परिधान करणे प्रत्येक कॅरेटला अभिमान वाटला पाहिजे ,त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संघ भावना आणि स्फूर्ती निर्माण होते असे उदगार याप्रसंगी त्यांनी काढले.
शाळेचे मुख्याध्यापक श्री बी.एम .हंगरगे यांनी शाल श्रीफळ देऊन कर्नल एम रंगराव साहेबांचा यथोचित सत्कार केला.बटालियन चे गणेश दत्ता व जसबीर कुमार यांनी राष्ट्रीय छत्र सैनिकांना ड्रिल व नकाशा वाचन यांचे प्रशिक्षण दिले.याप्रसंगी शाळेचे उपमुख्याध्यापक डॉ.पांडुरंग यमलवाड प्रा.सुभाष तिवडे व एनसीसी अधिकारी डॉ.माणिक गाडेकर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.