प्रतिष्ठा न्यूज

सांगशी येथे गव्यांनी घरालगतची उसलावण केली फस्त : शुक्रवारी निवडे येथे रस्ता रोको

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.५ : गगनबावडा परिसरात सध्या गव्या रेड्यानी शेतकऱ्यांची झोपच पळविली.येथील सांगशी (ता. गगनबावडा )येथील अशोक पडवळ यांच्या घरालगत उसाच्या शेतात  येऊन अर्धा एकरातील लावणीचा ऊस खाऊन फस्त केला आहे.तालुक्यात गव्या रेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांचे तोंडचे पाणीच पळविले आहे.येथील शेतकरी दिवस रात्र शेतीची राखण करतात,मात्र  शेतकऱ्यांची नजर चुकवत  हा गव्यांचा कळप येऊन शेताची नासधूस करत आहे. वनखात्याचे वनरक्षक संग्राम पाटील यांनी येऊन पंचनामा करून गेले, मात्र इत्तर तालुक्याच्या मानाने गगनबावडा तालुक्यास नुकसान भरपाई फार कमी आहे. ती वाढवून मिळावी म्हणून अनेकवेळा मागणी करूनही वनखाते दुर्लक्ष करत आहे.
याबाबत शेतकरी आक्रमक झाले असून शुक्रवारी १० फेब्रुवारी ला निवडे येथे रास्ता रोको आंदोलनही छेडले जाणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.