प्रतिष्ठा न्यूज

तासगावात पुरोगामी पक्ष,संघटनेकडून शेखर रणखांबे यांचा सत्कार…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव मधील पुरोगामी पक्ष व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रपती पदक विजेते दिग्दर्शक शेखर रणखांबे यांचा सत्कार सोहळा मोठया उत्साहात पार पडला.यावेळी अमर खोत यांनी प्रमुख मान्यवरांचे स्वागत केले,तर वासुदेव गुरव यांनी प्रास्ताविक केले.येथील प्रसिद्ध डॉक्टर पंडीत मॅडम यांच्या हस्ते शेखर रणखांबे यांचा सत्कार करण्यात आला.लघुपटातील मुख्य महीला कलाकार म्हणून पुरस्कार मिळवलेल्या माया पवार यांचा सत्कार छायाताई खरमाटे यांनी केला‌.माया पवार यांचे वडील जगणु पवार यांचा सत्कार हेमलता बागवडे यांनी केला.भास्कर सदाकळे यांचा सत्कार प्रा डॉ बाबुराव गुरव सर यांनी केला. सत्काराला उत्तर देताना शेखर रणखांबे यांनी रेखा लघुपटाची तयारी, चित्रिकरण आणि त्यानंतर अनेक पुरस्कार मिळाले,पण आपल्या गावात आपल्या कामाचे कौतुक होणं याचं अतिशय समाधान आणि आनंद या दोन्ही भावना असल्याचे सांगितले.तासगाव मधील माया पवार हिचा शोध तिच्या डोळ्यांत दिसणार्या वेदनेने संपवला आणि तिच्या असामान्य कर्तुत्वाने उत्कृष्ट अभिनेत्री ह्या पुरस्कारांची ती मानकरी ठरली.यापढे तिला अनेक संधी मिळतील त्याचा उपयोग करून घेण्यासाठी तिनं आत्ता शिक्षण घ्यायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी सर्वानी “रेखा “या लघुपटाचे तासगाव मध्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.भास्कर सदाकळे यांनी शेखर रणखांबे यांचा आणखीन मोठ्या प्रमाणावर नागरी सत्कार आयोजित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मारुती शिरतोडे यांनी अतिशय खडतर प्रवास करत मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले.तासगाव मधील “रेखा”ची भुमिका पार पाडणारी माया आत्ता रेखा या नावाने ओळखली जाईल अशी अपेक्षा अर्जुन थोरात यांनी व्यक्त केली.उपेक्षित लोकांची वेदना दाखवणारी फिल्म तासगाव करांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शरद शेळके यांनी सांगितले.नुतन परिट यांनी माया पवार यांना साक्षर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आणि त्यांनी आभार मानले.यावेळी प्रा वासुदेव गुरव,डॉ कविता जाधव, विशाल खाडे,सुनिल गुरव,हिम्मत मलमे,सुनिल मलमे मंडले मॅडम उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.