पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आर.सी.सी गटार कामाचा वार्ड क्रं ८ मध्ये शुभारंभ
प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : वार्ड नं ८, विद्यानगर गल्ली नं ५ मधील आर.सी.सी गटार कामासाठी पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नगरविकास खाते मार्फत मंजूर झालेल्या कामाचा विद्यानगर रहिवासी अरूण पितांबरे व अरुणा टिकेकर (काकू) यांच्या हस्ते शुभारंभ झाला.
सदर शुभारंभ प्रसंगी परिसरातील रवि खराडे, अण्णाप्पा कोष्टी, अशुतोष पितांबरे, कुलकर्णी, रामभाऊ कोळेकर, बाळासाहेब माने, स्वप्नील औंधकर, चंद्रकांत मिसाळ, नंदु धामणीकर, राम परदेशी आदी नागरीक उपस्थित होते.