प्रतिष्ठा न्यूज

तासगावात उद्या श्री संत नरहरी सोनार पुण्यतिथी सोहळा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : येथील विश्वकर्मा सुवर्णकार समाज सेवा संस्था व कालिका महिला मंडळ यांच्या पुढाकाराने श्री संत शिरोमणी नरहरी सोनार पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन उद्या दि.27 रोजी तासगाव येथे करण्यात आले आहे.यावेळी समस्त सोनार समाज बंधू भगिनी यांच्या पुढाकाराने विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ठीक ९ वाजता किशोर पंडित पटवर्धन कॉलनी भारती विद्यामंदिर जवळ यांचे निवासस्थानी प्रतिमापूजन,भजन कीर्तन तसेच 12 वा.पुष्पवृष्टी,त्यानंतर साय.7 वा.श्री विठ्ठल मंदिर शिंपी गल्ली याठिकाणी महाआरती व महाप्रसाद अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी भाविक बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सुवर्णकार समाज सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.