प्रतिष्ठा न्यूज

तुरची पोलीस प्रशिक्षण केंद्रात दीक्षांत संचलन सोहळा संपन्न…पोलीस दलाच्या ब्रीद वाक्यास शोभेल असे वर्तन ठेवा अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : पोलीस प्रशिक्षण केंद्र, तुरची येथे सत्र क्रमांक ०९ मधील ६०९ प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार यांचा दीक्षांत संचलन सोहळा आज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे कवायत मैदानावर पार पडला.दीक्षांत संचलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजकुमार व्हटकर,(भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक,प्रशिक्षण व खास पथके,महाराष्ट्र राज्य,मुंबई यांनी मानवंदना स्विकारली.सदरच्या दीक्षांत संचलनाचे परेड कमांडर नवप्रविष्ठ प्रशिक्षणार्थी पोलीस अंमलदार/१३,प्रसाद तानाजी माने हे होते.पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी यांचे सत्र क्र ०९ हे २५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरु झाले होते. त्यामधील ६०९ प्रशिक्षणार्थी या पोलीस दलात रुजू होण्यासाठी सर्वाथाने सज्ज झाले आहेत.या सत्रामध्ये समाविष्ट असलेले ६०९ प्रशिक्षणार्थी हे मुंबई शहर,सातारा, सांगली,कोल्हापूर,सिंधुदूर्ग,रत्नागिरी, पुणे लोहमार्ग,लातूर,सोलापूर शहर, सोलापूर ग्रामिण,ठाणे शहर या घटकांमधून आले होते.या प्रशिक्षण सत्राचा कालावधी ०६ महिन्यांचा होता.सदर ०६ महिन्यांच्या कालावधीत त्यांना वेगवेगळे फौजदारी कायदे,कायदा व सुव्यवस्था,विज्ञान व तंत्रज्ञान,पोलीस प्रशासन तसेच भावनिक प्रज्ञावंत या विषयांचे सखोल ज्ञान देण्यांत आले आहे.तसेच बाहयवर्गातील शारिरीक कवायत प्रशिक्षण,परेड,पोलीस खात्यातील अत्याधुनिक हत्यारांचे प्रशिक्षण,गोळीबार सराव,कमांडो प्रशिक्षण व योगाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.सदर कार्यक्रमांचे वेळी धीरज पाटील प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची यांनी प्रशिक्षणार्थी अंमलदार यांना सेवेची शपथ दिली.तसेच पोलीस प्रशिक्षण केंद्राचे अहवाल वाचन केले.अहवाल वाचनामध्ये प्राचार्य धीरज पाटील  यांनी प्रशिक्षणार्थीना परिपूर्ण पोलीस बनविण्यासाठी ई-लनींग,अॅम्बीस, संगणक व ट्रॉफिक मॅनेजमेंट या पूरक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे,बाहयवर्ग प्रशिक्षणामध्ये शारिरीक क्षमता विकसित होणेसाठी सर्व प्रकारची कवायत त्यासोबतच जंगल कॅम्प,नाईट फायर,योगासने, प्राणायम,कराटे,गोळीबार इ.विषय समाविष्ट केले.त्यासोबतच नजिकच्या पोलीस स्टेशन भेटी देवून पोलीस ठाणे अंतर्गत कामकाजाचे प्रशिक्षण दिले.तसेच एक सुंदर अद्यावत व ई-ग्रंथालव व ई-बुक उपक्रम चालु करणारे महाराष्ट्रात प्रथमच पोलीस प्रशिक्षण केंद्र तुरची आहे.त्यामुळे पोलीस पाल्यांना व पोलीस अधिकारी / अंमलदार यांना स्पर्धा परिक्षाकरीता व वैयक्तीक ज्ञान वाढविणेकरीता मदत झाली असल्याचे सांगितले.या सत्रा दरम्यान जिल्हा क्रिडाधिकारी,सांगली यांचेकडून क्रिडांगण विकास अनुदानांतर्गत प्राप्त रु.१५,००,०००/- इतक्या निधीतून या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जिम्नॅशिअम हॉलमध्ये अत्याधुनिक पद्धतीचे सिंथेटिक मॅटसह सुसज्ज असे बॅडमिंटन कोर्ट तसेच ओपन जिमची सुविधा नुकतीच सुरु केलेली आहे.या प्रशिक्षण केंद्राकडील उपलब्ध विकास निधीतून रु.१९,९९,०२०/- इतक्या रक्कमेची CCTV यंत्रणादेखील बसविणेत आलेली आहे.त्याचप्रमाणे,जिल्हा नियोजन समिती,सांगली यांचेकडून प्राप्त अनुदानातून रु.४८,९७,९५०/- इतक्या किंमतीच्या ५० संगणक व २० प्रिंटर्सची खरेदी करण्यात आली असून, रु.८,८५,८२२/- इतक्या किंमतीची कार खरेदी करण्यात आली आहे.याबद्दल माननीय पालकमंत्री सांगली,माननीय जिल्हाधिकारी,आणि जिल्हा विकास व नियोजन समिती यांचे मी ऋणनिर्देश व्यक्त करतो. अशाप्रकारे, एकूण रक्कम रु.९२,८२,७९२/- इतक्या रक्कमेची विकासकामे या कालावधीत करणेत आली असल्याचें सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे राजकुमार व्हटकर( भा पो से )अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके,महाराष्ट्र राज्य,मुंबइ यांनी प्रशिक्षणार्थी अंमलदार यांना मोलाचे मार्गदर्शन केले.आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांघीकपणे कर्तव्ये करावे,गणवेष अंगावर आली की आपण समाजाचे देणे लागतो हे लक्षात ठेवावे.” सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ” या महाराष्ट्र पोलीस दलाच्या ब्रिद वाक्यास शोभेल असे वर्तन ठेवावे आपल्या कृतीने मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी,आदर्श पोलीस अंमलदार म्हणून समाजाची सेवा करावी.पिडीत जनतेस कायद्याच्या चाकोरीत राहून आपण अशा प्रकारे मदत करावी की,जनतेस पोलीस देवासमान वाटला पाहिजे,अनावश्यक आर्थिक गोष्टींची अपेक्षा ठेवून भ्रष्टाचाराला खतपाणी घालू नये. जनतेबरोबर निस्वार्थीपणे वागणे आवश्यक आहे असे संबोधीत केले. आणि शेवटी अथक प्रयत्न करुन अत्यंत सुंदर असे कवायत संचलन केल्याबद्दल प्राचार्य धीरज पाटील व सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
या कार्यक्रमांस आमदार सुमनताई पाटील,संदीप घुगे (भा.पो.से.), पोलीस अधीक्षक सांगली,जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील तुरची, गावचे सरपंच व इतर मान्यवर तसेच प्रशिक्षणार्थीचे नातेवाईक, उप-प्राचार्य,प्रशासन श्रीमती राजश्री पाटील,उप-प्राचार्य प्रशिक्षण सुजय घाटगे, सत्र समन्वयक श्रीकृष्ण हारुगडे व सर्व आंतरवर्ग अधिकारी, बाहयवर्ग अधिकारी,प्रशिक्षक,सर्व पोलीस अंमलदार व त्यांचे कुटूंबिय, मंत्रालयीन कर्मचारी, वर्ग-४ सर्व कर्मचारी उपस्थित होते.तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राखीव पोलीस निरीक्षक राजू शिंदे यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.