प्रतिष्ठा न्यूज

सावळज गावचे ग्रामदैवत श्री सावळसिद्ध देवाची यात्रा शनिवारी 31 ऑगस्ट पासून सुरू

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज : येथील पुरातन काळापासून जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले तसेच श्रद्धाळू भक्तांना पावणारे देवस्थान म्हणून ख्याती असलेले सावळज गावचे ग्रामदैवत श्री सावळसिध्द देवाची यात्रा  श्रावण महिन्यातील शेवटच्या शनिवारी भरते.
सावळसिध्द हे जागृत व नवसाला पावणारे देवस्थान असल्यामुळे सावळज पंचक्रोशीसहित परराज्यातील भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थिती लावत असतात.
तासगाव तालुक्यातील अग्रणी नदीकाठी वसलेले सावळज गाव इतिहासाकालीन प्रसिद्ध असून याच सावळज गावात श्री सावळसिध्द देवाचे  सुमारे 450 वर्षांपूर्वीचे मंदिर असून हे मंदिर हेमाडपंथीय बांधणीचे आकर्षक मंदिर आहे,या देवस्थानला श्री सिद्धेश्वर असेही म्हंटले जाते, या मंदिरातील मूर्तीची प्रतिष्ठापना पुरातन काळी समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते झाल्याचे सांगितले जाते.
सावळसिध्द देवाची मूर्ती ही मारुतीच्या रुद्रावतारातील असल्याने सावळसिध्द उर्फ मारुतीदेव असेही म्हंटले जाते ही मूर्ती एकसंघ असून त्याची उंची सहा फूट आहे मंदिराभोवती चारी बाजूने चिरेबंदी उंच दगडी तटबंदी आहे या तटबंदीच्या वरती चारही बाजूला आकर्षक मोठे बुरुज आहेत याच तटबंदीच्या बाहेरून मूर्तीचे थेट दर्शन घेता यावे यासाठी मंदिरासमोरील तटबंदीला खिडकी आहे.
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सावळसिद्ध देवाची मोठी यात्रा येत्या शनिवारी व रविवारी भरत असून या यात्रेत पाळणे, खेळणी,मेवामीठाईची दुकाने मोठ्या प्रमाणावर सजू लागली आहेत, भाविक भक्तांकडून देवाला  नैवेद्य,अभिषेक, पूजाविधी,केले जात आहेत. या यात्रेचे चोख नियोजन सावळसिध्द यात्रा कमिटी सावळज,ग्रामपंचायत सावळज, तसेच पोलीस प्रशासन सावळज यांच्या संयुक्तिक सहकार्याने होत आहे.
सावळज परिसरात सध्या सुरू असलेला चोरट्यांचा धुमाकूळ,तसेच नागरिकांमध्ये पसरलेले भीतीचे वातावरण तसेच वाढत्या चोऱ्या माऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख व कडेकोट ठेवणे पोलीस प्रशासना समोर मोठे आव्हान असणार आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.