प्रतिष्ठा न्यूज

नूतन ज्ञानमंदिर पूर्व प्राथमिक विद्यामंदिर तिसगाव “सफर बालनगरची” शैक्षणिक प्रकल्प मांडणी उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
तिसगाव प्रतिनिधी : नूतन ज्ञानमंदिर पूर्व प्राथमिक विद्यामंदिर तिसगाव कल्याण पूर्व येथे १८-११-२२ व १९-११-२२ या दिवशी “सफर बालनगरची” शैक्षणिक प्रकल्प मांडणी करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या उद्घटनाला प्रमुख पाहुण्या मा. प्राध्यापक सौ. प्रतिभा नेरकर मॅडम लाभल्या. त्यांनी प्रकल्पाची मांडणी बघून झाल्यावर आम्हाला व आमच्या पालकांना खूप छान मार्गदर्शन केले. व पालकांचे फूल देऊन त्यांचे कौतुक केले.
या प्रकल्पा मध्ये विध्याभरतीच्या प्रशिक्षणानुसार मुलांनवर चांगले संस्कार व्हावेत, मुलांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, यासाठीच्या १२ व्यवस्था मांडण्यात आल्या होत्या.
या व्यायस्था मध्ये चित्रपुस्तिका होत्या की जेणे करून त्या पुस्तिका मुलांना हाताळता येतील. वेगवेगळ्या मूर्ती, मुखवटे, घर कसे असावे घराची मांडणी कशी असावी घरात कोणत्या वस्तू असतात ह्याची मांडणी करण्यात आली. वस्तुसंग्रहालयामध्ये वेगवेगळी शस्त्रे, हत्यारे, वेगवेगळी जुनी वाहने यांची मांडणी करण्यात आली. मुलांनी बनवलेल्या टाकाऊ पासून टिकाऊ अश्या वस्तू बनवल्या होत्या. उदा. चिक्तकं ठसेकाम, चित्रकला याची मांडणी करण्यात आली. प्रदर्शनी कोपरा यामध्ये सर्व प्रकारचे तक्ते, माती पासून बनवलेल्या वेगवेगळ्या वस्तू, भांडी, याची मांडणी करण्यात आली. ‘जंगल सफारी’ (प्राणी – पक्षी संग्रहालय)करण्यात आली यामध्ये प्रत्यक्ष जंगल कसे असते जंगलात कोणते प्राणी पक्षी असतात ते दाखवण्यात आले. सर्वांना आवडणारे असे जंगल होते. लहान मुलांना विज्ञानाचा अनुभव अतिशय महत्त्वाचा आहे. पदार्थांचे मूळ स्वभाव ओळखणे हेच विज्ञान आहे. त्याचा अनुभव मिळाल्याने व्यक्तीचे विचार व दृष्टिकोन वास्तव, योग्य व तर्कसंगत आधार असलेला होतो. विज्ञानाचा अनुभव कोणाही व्यक्तीला स्वतः निरीक्षण, परीक्षण आणि कृती यांनीच होऊ शकतो. याचा विचार करून प्रयोगाची मांडणी करण्यात आली उदा. तरंगणे बुडणे, हवेचा गुणधर्म इ. तसेच रंगमंच कसा असतो. हे देखील दाखवण्यात आले. बालवाडीत शिशू अनेक प्रकारच्या अभिव्यक्ती करतात. नाटक, नृत्य, संगीत – सभेचे आयोजन करतात. रंगमंचावर कोणत्या गोष्टी आवश्यक आहे या सर्व गोष्टींचा विचार करून रंगमंचा ची मांडणी केली. तसेच भाषा, गणित, इंग्रजी, सा. ज्ञान या शैक्षणिक साहित्यांची देखील मांडणी करण्यात आली. शौर्य, पराक्रम, उस्ताह, धैर्य, सहनशक्ती, बलसंपादन इ. चे केंद्र म्हणजे क्रीडांगण आहे. बालक न थकणाऱ्या उस्ताह व कार्यशक्तीच साठा असते. त्यांच्या प्रकटीकरणासाठी क्रीडांगण महत्त्वाचे आहे.
या सर्व प्रकल्प मांडणीचे आयोजन आमच्या पूर्व प्राथमिक विद्यामंदिर च्या मुख्याध्यापिका सौ. भाग्यश्री जोशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिक्षिका सौ. समिधा कदम व सौ. दीपिका पवार यांच्या मेहनतीने व पूर्व प्राथमिक विभागाच्या सर्व शिक्षकवृंद व पालकांच्या प्रचंड मेहनतीने व मदतीने या प्रकल्पाची मांडणी करण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.