प्रतिष्ठा न्यूज

चिखलगोठण फाट्यावर रात्रीस खेळ चाले, भानामती प्रकाराने विद्यार्थी भीतीच्या छायेत

प्रतिष्ठा न्यूज / सौरभ निकम
निंबळक : तासगाव तालुक्यातील चिखलगोठण फाट्यावर शनिवारी रात्रीच्या सुमारास चिखलगोठण, निंबळक,बोरगांव आणि बोरगाव हायस्कुल जाणारा रस्त्याच्या चौकात अज्ञात व्यक्तीकडून करणी केल्याची घटना घडली आहे.
चिखलगोठण फाट्यावरून पंचक्रोशी हायस्कुलला शिक्षणासाठी जाणाऱ्या निंबळक आणि नवे बोरगाव येथील मुलाची संख्या जास्त आहे.परंतु अंधश्रद्धाळू लोकांच्याकडून वारंवार किमान मंगळवार, शुक्रवार, अमावश्या आणि पौर्णिमा यादिवशी हमखास भानामतीचा कार्यक्रम असतो.शाळेला जाणारे विध्यार्थी चौकातील करणीच्या प्रकाराने भीतीच्या छायेत प्रवास करत आहेत. वारंवार घडणाऱ्या करणी, भानामती प्रकाराची दखल घेऊन पोलिसांनी कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.


दरम्यान गावालगत असणाऱ्या चौक आणि तीन रस्त्याचा वापर भोंदुबाबा आणि अंधश्रद्धाळू मंत्रिकांना बरोबर घेऊन येऊन भानामती करत असल्याचे बोलले जात आहे. प्रवाशी आणि नागरिकांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे. समाजात अंधश्रद्धेची जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
वास्तविक पाहता माणसाने आपल्या कर्तृत्वार विश्वास ठेवला पाहिजे. सुप, दुरडी, लिंबू,नारळ, लवंग,मिरे आणि काळ पांढर लावून काहीही होत नाही.मुळातच हा घडत असलेला प्रकार निंदनीय आहे.अश्या भानामती केलेल्या प्रकारांचा निंबळक, चिखलगोठण, बोरगाव गावातील पुढारी पत्रकार किरण निकम, शंकर सोमदे, किरण पाटील, अधिकाराव साळुंखे,अनिल पाटील, अक्षय पवार, महादेव पवार,शिक्षक पांडुरंग महाडिक, हायस्कुल चे सर्व विध्यार्थी,यांनी सर्व साहित्य जाळून निषेध केला व अंधश्रद्धावर विश्वास ठेऊ नये असं आवाहन केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.