प्रतिष्ठा न्यूज

तासगावात जय श्रीराम म्हणत भव्य श्रीराम मंगल कलश शोभायात्रा…भाजपा युवानेते प्रभाकर पाटील यांची उपस्थिती…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : थेट अयोध्यातून देशभरामध्ये श्रीराम भक्तांसाठी पाठवण्यात आलेल्या अक्षतांचे रविवारी दुपारी तासगावात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले होते.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे श्रीराम यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.या सोहळ्या दरम्यान वाहण्यात येणाऱ्या अक्षता अयोध्येतून संपूर्ण देशात पोहोचवल्या जात आहेत.जवळपास ५०० वर्षांच्या संघर्षानंतर आणि असंख्य कार्यकर्त्यांच्या अविरत प्रयत्नातून अयोध्या नगरीमध्ये श्री रामांचे भव्य मंदिर उभे रहात आहे,आणि श्री रामांची पुन्हा स्थापना होत आहे.या कार्यक्रमाच्या निमंत्रण अक्षता थेट अयोध्या नगरीतून तासगांव शहरात आल्या आहेत.या अक्षता कलशांची भव्य शोभायात्रा आज हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत पार पडली.यावेळी सामील सर्वच महिलांच्या डोक्यावर अक्षता कलश देण्यात आले होते.श्री स्वयंभू मारुती मंदिर पागा गल्ली येथून 5 वाजता या शोभा यात्रेस सुरुवात झाली.हि यात्रा पागा गल्ली,शिंदे गल्ली,कालगांवकर कार्यालय,डॉ.लुगडे हॉस्पिटल,वरचे गल्ली,लुगडे गल्ली,श्री संत सेना महाराज मंदिर ढवळ वेस,डॉ.गाडवे हॉस्पिटल दाणे गल्ली,डब्बास गल्ली कॉर्नर माळी गल्ली,विटा नाका,श्री शिवतीर्थ गुरुवार पेठ,भगवा चौक श्री गणपती मंदिर,पोस्ट आॕफिस श्री सिद्धेश्वर मंदिर,मार्गे श्रीराम मंदिर याठिकाणी येऊन समारोप करण्यात आली.यावेळी शोभा यात्रेत प्रत्यक्ष अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षतांचे कलश,तालुक्यातील प्रत्येक गांवांना रवाना होणारे मंगल अक्षता कलश, सजवलेला आकर्षक रथ,श्री रामाची भव्य मूर्ती,श्री महाबली हनुमानाची भव्य सजीव मूर्ती, झांज पथक, ढोल-ताशा पथक,भजनी मंडळ, ऊंट,घोडे,भगवे ध्वज घेतलेले रामभक्त,श्री राम पंचायतन सजीव देखावा,लेझिम मंडळ,भूपाल माने ब्रास बँड पथक सहभागी झाले होते.यावेळी श्रीराम कलश यात्रेचे नागरिकांकडून सडा,रांगोळ्या,फटाके उडवून स्वागत करण्यात आले.यावेळी तासगांवसह तालुक्यातील श्रीराम भक्त भगव्या टोप्या घालून सहभागी झाले.अबाल वृद्ध आणि महिलांचा सहभाग यावेळी लक्षनीय होता.श्री राम मंदिर याठिकाणी आरती होऊन सांगता झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.