प्रतिष्ठा न्यूज

गुलाबराव पाटील संकुलात प्रा. रेजुला वाकीतोडी यांना श्रद्धांजली

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. २५ : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचलित बी.एड. आणि डी.एड. कॉलेजच्या प्राध्यापिका सौ. रेजुला देवदास वाकीतोडी ( वय ४६ ) यांचे दि. २४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले गुलाबराव पाटील शिक्षण संकुलामध्ये त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या निधनाबद्दल संस्थेचे संस्थापक- चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, गेली सोळा वर्षे त्या येथे कार्यरत होत्या. अत्यंत प्रभावी अध्यापन, मनमिळाऊ स्वभाव आणि विद्यार्थीप्रिय अशा व्यक्तिमत्त्वाच्या एक चांगल्या प्राध्यापिका आमच्या संस्थेचा भाग होत्या. कॉलेजच्या विकासात त्यांच्या कार्याचा वाटा मोठ्या प्रमाणात होता. कॉलेजच्या नावलौकिकांमध्ये त्यांनी भर टाकली. अशा गुणवंत प्राध्यापिकेचे आज आमच्यातून जाणं हे फार दुःखदायी आहे. ही पोकळी कधीही भरून निघणारी नाही.

यावेळी सर्व विभागाचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी हे उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.