प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापालिकेत राजीव गांधी यांना आदरांजली : मनपा कर्मचाऱ्यांनी घेतली सद्भावना शपथ

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांना जयंतीदिनी आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त मनपा कर्मचाऱ्यानी सद्भावनेची शपथ घेतली.
मनपा आयुक्त सुनील पवार आणि स्थायी सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते स्व. राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते विनायक सिंहासने, राष्ट्रवादीचे गटनेते मेनुद्दीन बागवान, उपायुक्त राहुल रोकडे, उपायुक्त चंद्रकांत आडके, माजी महापौर आणि नगरसेविका संगीता खोत , नगरसेवक संतोष पाटील, मनोज सरगर, लेखाधिकारी स्वप्नील हिरगुडे, सिस्टीम मॅनेजर नकुल जकाते, प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, पाणीपुरवठा अभियंता सुनील पाटील यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सर्वाना सद्भावना शपथ देण्यात आली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.