गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात अमृत महोत्सव साजरा
प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : मिरज येथील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या 76 व्या स्वातंत्र्यदिनीचे ध्वजारोहण प्रमुख पाहुणे संस्थेचे संस्थापक पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना आपल्या देशाची निष्ठा राखण्या विषयी सांगितले. ज्या क्रांतिवीरांनी प्राणाची आहुती दिली त्यांच्या कार्याची व विचारांची धुरा प्रत्येकांनी जपली पाहिजे व आपला देश व राष्ट्र यांचा मान व तिरंगा यांचा सन्मान सदोदित राखला पाहिजे असे सांगितले.
या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत मातेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यामध्ये देशभक्तीपर गीते व गायन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त वीरेंद्रसिंह पाटील तसेच सर्व शाखांचे प्राचार्य, पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.