प्रतिष्ठा न्यूज

जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांना काँग्रेसची मानवंदना ; सांगली काँग्रेस भवनासमोर सुती हार अर्पण करून अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.२२ : जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव भुजंगराव माने यांचे वयाच्या १०० व्या वर्षी भारती हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू असताना मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. स. १० वा. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले. तेथून स. ११ वा क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ पार्थिवाचे सांगलीकरांनी अंत्यदर्शन घेतले . पुढे काँग्रेस भवन येथे त्यांच्या पार्थिवावर ऋतुराज पाटील यांनी सुती हार अर्पण करुन अभिवादन केले . यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील हे प्रारंभापासून शेवटपर्यंत अंत्ययात्रेत सहभागी होऊन काँग्रेस पक्षातर्फे अभिवादन केले. सांगली काँग्रेसने ‘अमर रहे – अमर रहे माधवराव माने अमर रहे, भारत माता की जय’ अशा घोषणा देत अभिवादन केले.
“माधवराव माने यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थी दशेतच भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील चले जाव चळवळीत उडी घेतली. त्यांनी तासगाव तहसीलदार कचेरीवर तिरंगा फडकावला होता. त्यांनी सातारा, विजापूर, धारवाड व नाशिक कारागृहात ९ महिन्याचा तुरुंगवास भोगला होता. तरुण मुलांचे संघटन करुन ब्रिटिश सरकारच्या विरोधात जनमत तयार करण्यात त्यांचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्यानंतर त्यांनी तासगाव विणकर सोसायटीची स्थापना करुन सहकार क्षेत्रातही काम केले होते . त्यांच्या निधनाने सांगलीतील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिकापैकी शेवटचा तारा निखळला.काँग्रेस पक्षाला त्यांचे कायम मार्गदर्शन व आशीर्वाद लाभले होते. शंभराव्या वर्षात पदार्पणानिमित्त जन्मशताब्दी वर्षात त्यांचा मेधा पाटकर यांच्या उपस्थितीत पृथ्वीराज पाटील व सांगलीकरांच्या वतीने सांगलीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला होता.

काँग्रेस भवनासमोर त्यांना आदरांजली वाहण्यात आली त्यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील, ऋतुराज पाटील, बिपीन कदम, अजित ढोले, प्रा. एन. डी. बिरनाळे,अशोकसिंग रजपूत, पैगंबर शेख, अरुण पळसुले, सुभाष यादव,रघुनाथ नार्वेकर, बाबगोंडा पाटील, अल्ताफ पेंढारी, प्रशांत देशमुख, इलाही बारुदवाले, याकूब मणेर, नामदेव पठाडे ,कोळी मामा व काँग्रेस कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
अमरधाम स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.