प्रतिष्ठा न्यूज

जिजाऊ ब्रिगेड बुधगाव शाखेच्या अध्यक्षपदी सारिका पवार यांची नियुक्ती

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : जिजाऊ ब्रिगेड, सांगली तर्फे घेण्यात येणार्‍या सावित्री जिजाऊ दशरात्रौत्सव दरम्यान बुधगाव येथे जिजाऊ ब्रिगेडची ग्रामशाखा स्थापन करण्यात आली. शाखेच्या अध्यक्षपदी सारिका पवार यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना जिजाऊ ब्रिगेडच्या विभागिय उपाध्यक्ष शीतल मोरे यांच्या हस्ते नियुक्ति पत्रक देण्यात आले.
यावेळी अवयदान जागृतीवर व्याख्यानाचे आयोजन केले होते. डॉ. सार्थक पाटील यांनी अवयवदानाचे महत्व समजावुन सांगितले. जिवंतपणी व मृत्युनंतर मनुष्याचे कोणते अवयव दान करावे याची विस्तृत माहिती डॉ. पाटील यांनी दिली.
महिलांनी कर्मकांड व चुकिच्या परंपराच्या आहारी न जाता असे समाजपयोगी उपक्रम राबवावे असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा प्रणिता पवार यांनी.
काही महिलांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींचे अवयव व देहदान केल्याचे अनुभव सांगितले. अवयवदानाविषयी असलेल्या शंकांचे निरसनही यावेळी डाॅ. पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुभाष पाटील यांनी तर आभार अदीती पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे नियोजन शुभांगी शिंदे, अर्चना पाटील, अपर्णा सुर्यवंशी, पुर्वा कुंभार, सविता पाटील, डॉ. आक्कोळे यांचाही सहभाग होता.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या ज्योती सावंत, जयश्री घोरपडे पद्मजा माने यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.