प्रतिष्ठा न्यूज

खासदार प्रताप पाटील चिखलीकर व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नाने लवकरच नांदेड मुंबई वंदे भारत अति जलद रेल्वे सुरू होणार-बालाजी बच्चेवार; नांदेडकरांना मिळणार आणखी एक भेट

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत असताना नांदेडकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब समोर आली आहे. आजच रेल्वे राज्यमंत्री व आमचे नेते माननीय रावसाहेब जी दानवे व नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मुंबई – नांदेड या रेल्वे मार्गावर लवकरच वंदे भारत ही अति जलद रेल्वे सुरू होणार आहे अशा पद्धतीची माहिती दिली आहे त्यामुळे नांदेड करांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे या वंदे भारत रेल्वेमुळे सहा तासात मुंबईला नांदेडकर पोहोचू शकणार आहेत त्यामुळे वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होणार असल्याचे बालाजी बच्चेवार हे आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सर्वच आघाड्यांवर विकास सुसाटपणे सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे देशभर विणले जात असताना रेल्वे मार्गही सक्षम करण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे. देशभरातील अनेक भागात रेल्वेचे नवे जाळे विणले जात आहे. वंदे मातरम ही अत्यंत जलद वेगवान रेल्वे गाडीही देशवासीयांना सुलभ आणि सुकर प्रवास करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. वंदे मातरम रेल्वेचा लाभ मराठवाड्यातील आणि नांदेडच्या रेल्वे प्रवाशांना होण्यासाठी मुंबई – नांदेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून विद्युतीकरणाचे काम पूर्ण होताच वंदे भारत ही रेल्वे मुंबई- नांदेड धावणार आहे.
यासाठी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विशेष परिश्रम लाभले आहे. त्यामुळे मराठवाड्याचे आणि नांदेडच्या विकासाला नवी गती मिळणार असून नांदेडकरांसाठी वंदे भारत ट्रेन एक मैलाचा दगड ठरणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बालाजी बच्चेवार यांनी नमूद करण्यात केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.