प्रतिष्ठा न्यूज

सांगली महापौर चषक कब्बडी स्पर्धेत रोमहर्षक सामने ; रविवारी उपांत्य आणि अंतिम सामना होणार; कबड्डी शौकिनांची मोठी गर्दी

प्रतिष्ठा न्यूज
कुपवाड प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका आयोजित आणि राज्य व जिल्हा कब्बडी असोशीयन यांच्या मान्यतेने कुपवाड येथील नवमहाराष्ट्र हायस्कूलच्या क्रीडांगणावर सुरू असणाऱ्या महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा दुसऱ्या दिवशी झालेल्या साखळी पद्धतीच्या सामन्यात अनेक रोमहर्षक कब्बडी सामने पाहायला मिळाले. महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त स्मृती पाटील आणि उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नियोजनाखाली महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा सुरू आहेत.
रविवारी सायंकाळी उपांत्य आणि अंतिम सामना होणार असून  कामगारमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि राज्य कब्बडी असोशियनचे उपाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, माजी मंत्री जयंतराव पाटील, माजीमंत्री विश्वजीत कदम , खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ , जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई पाटील, माजी आमदार दिनकर पाटील, जिल्हा कब्बडी असोशियनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल दादा पाटील, भाजपाचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार,  जिल्हाध्यक्ष दिपकबाबा शिंदे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज , काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील , पै. राहुल पवार, कब्बडी असो. राज्य उपाध्यक्ष बाबुराव चांदोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महापौर चषक राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी  2 जून रोजी पुरुष आणि महिला गटाचे अनेक लक्षवेधी सामने झाले.
या सर्व विजयी संघानं अत्यंत चुरशीने सामने खेळत पुढच्या बाद फेरीमध्ये प्रवेश मिळवलेला आहे.  राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामना रविवारी सायंकाळी होणार असून रविवारी सायंकाळीच महापौर चषक स्पर्धेचा विजेता ठरणार आहे. या संपूर्ण स्पर्धांचे नियोजन सहाय्यक आयुक्त नितीनकाका शिंदे आणि क्रीडा अधिकारी महेश पाटील तर समालोचन सुहास व्हटकर हे करत आहेत. रविवारी सायंकाळी होणारें उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने पाहण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने रविवारी सायंकाळी 4 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन नितीन काका शिंदे आणि महेश पाटील यांनी केले आहे.
दरम्यान
शनिवारी तिसऱ्या दिवशी च्या सामन्यांची सुरुवात नगरसेवक विजय घाडगे नगरसेवक राजेंद्र कुंभार माजी आमदार दिनकर तात्या पाटील , सहायक आयुक्त नितीनकाका शिंदे, काका हलवाई, सदाभाऊ पाटील, क्रीडाधिकारी महेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आली.

शुक्रवार 2 जून रोजी साखळी फेरीतील सामन्यांचा अंतिम निकाल खालील प्रमाणे

*(महिला गट)*

महात्मा गांधी मुंबई विरुद्ध शिवाजी उदय सातारा या सामन्यात महात्मा गांधी मुंबईने 20 गुण घेत विजय मिळवला. शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा विरुद्ध सिद्धेश्वर व्यायाम  मंडळ माधवनगर यांच्यात झालेल्या सामन्यात शिवाजी वाळवा या संघाने 21 गुण घेत विजय मिळवला . तरुण मराठा सांगलीवाडी  आणि द्रोणा स्पोर्ट क्लब पुणे यांच्यात झालेली सामन्यात द्रोणा स्पोर्टस पुणे यांनी 9 गुण घेत विजय मिळवला. एमडी पुणे विरुद्ध शिवशक्ती सांगली या संघामध्ये झालेल्या सामन्यात एमडी पुणे संघाने 26  गुण घेत विजय मिळवला. कर्नाळा पनवेल विरुद्ध डायनामिक इचलकरंजी या संघात झालेल्या सामन्यात कर्नाळा पनवेल या संघाने ३० गुण घेत विजय मिळवला. तरुण भारत सांगली विरुद्ध मातोश्री कोकरूड या संघात मातोश्री संघाने 51 गुण घेत विजय मिळवला. याचबरोबर शिवशक्ती सांगली विरुद्ध कर्नाळा पनवेल संघात कर्नाळा पनवेल संघ 31 गुण घेत विजयी झाला. एमडी पुणे विरुद्ध डायनॅमिक इचलकरंजीमध्ये एमडी पुणे या संघाने 29 गुण मिळवत विजय मिळवला. अनिकेत खेड विरुद्ध तरूनभारत सांगली यांच्यात अनिकेत खेड या संघाने 29 गुण घेत विजय मिळवला. प्रकाश तात्या बालवलकर पुणे विरुद्ध  महात्मा गांधी मुंबई उपनगर यांच्यात महात्मा गांधी संघाने 5 गुण घेत विजय मिळवला.
शिवशक्ती मुंबई विरुद्ध तरुण मराठा सांगलीवाडी संघात झालेल्या सामन्यात शिवशक्ती मुंबई संघाने 47 गुण घेत विजय मिळवला. राजमाता जिजाऊ पुणे विरुद्ध सिध्देश्वर माधवनगर यांच्यातील सामन्यात 49 गुण घेत राजमाता जिजाऊ पुणे संघ विजयी ठरला.

*(पुरुष गट)*
निर्मला औरंगाबाद विरुद्ध राकेश भाऊ घुले पुणे यांच्यात झालेल्या सामन्यात निर्मला औरंगाबाद संघाने 18 गुण घेत विजय मिळवला. गुड मॉर्निंग मुंबई विरुद्ध जी एम अहमदनगर यांच्यातील सामन्यात गुड मॉर्निंग मुंबई संघ 1 गुणाने विजयी झाला. तरुण मराठा सांगलीवाडी विरुद्ध जय हिंद इचलकरंजी या संघातील सामन्यात दोन्ही संघाला समान गुण मिळाले आहेत. शिवाजी व्यायाम मंडळ वाळवा विरुद्ध स्वस्तिक मुंबई या सामन्यात 19 गुण घेत स्वस्तिक मुंबई संघाने विजय मिळवला. जयमातृभूमी सांगली विरुद्ध शिवमुद्रा कौलव या सामन्यात शिवमुद्रा कौलव या संघाने 5 गुण घेत विजय मिळवला. विजय क्लब मुंबई विरुद्ध दसपटी रत्नागिरी या संघात झालेल्या सामन्यात 14 गुण घेत दसपटी रत्नागिरी संघाने विजय मिळवला. बाबुराव चांदोले पुणे विरुद्ध जयहिंद इचलकरंजी या संघामध्ये झालेल्या सामन्यात बाबुराव चांदोले पुणे या संघाने 10 गुण घेत विजय मिळवला. इस्लामपूर व्यायाम मंडळ इस्लामपूर विरुद्ध राकेश भाऊ घुले पुणे या संघात झालेले सामन्यात राकेश भाऊ घुले पुणे संघ 1 गुण घेत विजय झाला. याच पद्धतीने शाहू सडोली विरुद्ध जीएम अहमदनगर या संघात झालेल्या सामन्यात जीएम अहमदनगर या संघाने 13 गुण विजय मिळवला आणि जय भारत मुंबई विरुद्ध शिवमुद्रा कौलव या संघात झालेल्या चुरशीच्या सामन्यात शिवमुद्रा कौलव संघाने 28 गुण विजय मिळवला.

*राष्ट्रीय खेळाडूंची चमकदार कामगिरी*
कुपवाडमध्ये सुरू असणाऱ्या राज्यस्तरीय महापौर चषक कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय कबड्डीपटू स्वप्निल शिंदे (राष्ट्रीय खेळाडू) , शेखर तटकरे  (राष्ट्रीय खेळाडू), कृष्णा मदने (प्रो कबड्डी खेळाडू, आंतरराष्ट्रीय खेळाडू ) याच पद्धतीने सौरभ कुलकर्णी ( राष्ट्रीय खेळाडू) आदी राष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेत चमकदार कामगिरी केली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.