प्रतिष्ठा न्यूज

माझी वसुंधरा अंतर्गत सांगली महापालिकेने हिराबाग वॉटर हाऊस मधील वडाच्या झाडाचे केले सूशोभिकरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्यावतीने हिराबाग जलशुद्धीकरण केंद्र येथील वडाच्या झाडाची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
माझी वसुंधरा अंतर्गत महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखाअभियंता ऋतुराज यादव यांनी या वडाच्या झाडाचा परिसर आणि कट्टा हा सुशोभित केला आहे. वटपौर्णिमेचे औचित्य सादत आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिकेने या वटवृक्षाचे सुशोभीकरण केले आहे. आज वटपौर्णिमेनिमित्त महापालिकेने वडाच्या झाडाला केलेली रोषणाई आणि वडाच्या झाडांची कट्टा सुशोभीकरण याबाबत महापालिकेचे आभार मानत समाधान व्यक्त केले. या वडाच्या झाडाचे पूजन करण्यासाठी हिराबाग कॉर्नर तसेच खंडोबा आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी उशिरापर्यंत महिला वर्गणी मोठी गर्दी केली होती तसेच रात्रीच्या वेळी केलेली विद्युत रोषणाई ही आकर्षक रित्या दिसून येत होती. महापालिकेच्या बांधकाम विभागाचे शाखाअभियंता ऋतुराज यादव यांनी या वडाच्या झाडाचे सुशोभीकरण केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.