प्रतिष्ठा न्यूज

शिवसेना खा.हेमंत पाटील यांच्या वरील गुन्हा रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला जन आक्रोश मोर्चा

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना
खासदार हेमंत पाटील यांच्यावर दाखल करण्यात आलेला ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा तत्काळ रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी बुधवार दि. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

येथील शासकीय स्णालयात २४ तासात २४ मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर संतम प्रतिक्रिया उमटल्या होत्या. खा. हेमंत पाटील यांनी या प्रकरणी शासकीय रुग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेतली व प्रशासनाला जाब विचारला. यावेळी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.वाकोडे यांना शौचालय साफ करण्यास भाग पाडण्यात आले म्हणून त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या कारणावरून खा. हेमंत पाटील यांच्यावर अनु. जाती, जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खा. हेमंत पाटील यांचे समर्थक कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज बुधवारी जन आक्रोश मोर्चा काढून आपला संताप व्यक्त केला.

समाजा समाजात भांडण लावण्याच्या हेतून काही राजकीय मंडळी हेतुपुरस्सर खोट्या अँट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल करीत आहेत. तसेच खा. हेमंत पाटील हे सर्व जाती धर्माच्या लोकांना समान वागणूक देवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. विशेष: बहूजन समाजाला सोबत घेऊन समाजसेवा करीत असतात. दवाखान्यात गेल्या नंतर ते केवळ अधिका-यांना सूचना करुन, सांगून थांबले नाहीत तर स्वतः पाणी घेऊन त्यांनी दवाखान्यात सुद्धा स्वत: स्वच्छता करण्यात सहभाग घेतला आहे. त्यामुळे अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल करणान्या प्रवृत्तीला आळा घालण्यात यावा, तसेच खा. हेमंत पाटील यांच्यावरील एट्रोसिटीचा गुन्हा तत्काळ रद्द करण्यात याचा या प्रमुख मागणीसाठी आज दि. ११ ऑक्टोबर रोजी शहरातील तिरंगा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. सर्व समाज संघटनांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या मोर्चात विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.