प्रतिष्ठा न्यूज

ठेकेदार व आर्किटेक यांच्यावर कारवाई करा अन्यथा तासगाव बाजार समितीसमोर उपोषण करणार – अमोल काळे

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : नवीन तासगाव बाजार समितीचे बांधकाम निकृष्ट करून त्यात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून,ठेकेदार व आर्किटेक यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही.याविरोधात तासगाव बाजार समितीसमोर ४ सप्टेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी दिला आहे.याबाबत काळे यांनी जिल्हा उपनिबंधक सांगली यांना निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात अमोल काळे यांनी म्हंटले आहे,गेले २ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तासगाव बाजार समितीच्या निकृष्ट बांधकामाबाबत पाठपुरावा करीत आहोत,निकृष्ट बांधकाम करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.मात्र अद्याप ठेकेदार व आर्किटेक यांच्यावर कोणतीच कारवाई झालेली दिसून येत नाही.तसेच संबंधित ठेकेदार व आर्कटिक्ट यांना आपल्या कार्यालयाकडून पाठीशी घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसत आहे.फक्त सरकारी वकिलांचा अभिप्राय येणे बाकी आहे.याबाबतची उत्तरे आपल्या कार्यालयाकडून वारंवार दिली जात आहेत.आपल्या कार्यालयाकडून याविषयाबाबत चालढकल होत असल्याचे दिसून येत आहे.तरी या संबंधित विषयाबाबत  ४ ऑगस्ट रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव समोर आमरण उपोषनास बसणार असल्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.