प्रतिष्ठा न्यूज

तासगावात 16 फेब्रुवारी पासुन खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री स्व.आर आर आबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आर आर आबा पाटील प्रतिष्ठानच्या माध्यमातून राहुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे.स्पर्धेचें उदघाटन रोहित पाटील यांच्या हस्ते होणार असून,
या एकांकिका स्पर्धेत आतापर्यंत 24 संघांनी सहभाग नोंदवला आहे. मुंबई, अलिबाग, पुणे, सातारा, कोल्हापूर,
सांगली, मिरज येथील संघाचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला 21000 रुपये व करंडक, द्वितीय क्रमांक 14000 रुपये व करंडक, तृतीय क्रमांक 7000 रुपये बक्षीस असून, वैयक्तिक बक्षिसे उत्कृष्ट लेखन, दिग्दर्शन, नैपत्य, ॲक्टर, स्त्री, पुरुष वेषभूषा दिली जाणार आहेत. स्पर्धेचा कालावधी दिंनाक 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी 3 दिवस रोज सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत साने गुरुजी नाट्यगृह तासगाव येथे असणार आहे. कार्यक्रम पाहण्यासाठी प्रवेश विना मूल्य आहे. तरी शहरातील नागरिकांनी एकांकिका स्पर्धा पाहण्यास यावे व स्पर्धकांना प्रोत्साहन दयावे असे आवाहन आयोजक राहुल संभाजी जाधव यांनी केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.