प्रतिष्ठा न्यूज

नाथपंतीय डवरी समाज आयोजीत तासगाव चषक क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगांव येथील नाथ पंथीय डवरी समाज यांचे वतीने रोहित पाटील यांच्या नेतृत्वा खाली तासगांव चषक क्रिकेट स्पर्धा ता. ०७/०२/२०२३ मंगळवार ते १२/०२/२०२३ रविवार अखेर तासगांव येथील आर. आर. पाटील क्रिडा संकुल येथे पार पडल्या. स्पर्धेसाठी तासगांव,कवठेमहांकाळ, सावळज,मांजर्डे,जत,सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, इचलकरंजी येथील एकुण ३२ संघानी सहभाग घेतला होता.यावेळी कोडोली टीमने प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवले,प्रथम क्रमांक बक्षीस आर आर पाटील स्पोर्टस क्लब कडून र.रु.३०,०००/- व ट्रॉफी देण्यात आली.व्दितीय क्रमांक बक्षीस सामना समिती कडून र.रु.२०,०००/- व टॉफी सागर माळ कोल्हापूर यांना देण्यात आले.तृतीय क्रमांक बक्षीस आमदार जगन्नाथ शिंदे आप्पा यांचेकडून र.रु. १०,०००/- व ट्रॉफी सांगली टिमला देण्यात आले.चतुर्थ क्रमांक बक्षीस सामन्त्र समिती कडून र.रु. ७,०००/- व ट्रॉफी वडगाव या टीमला देण्यात आले.बक्षीस समारंभ १२/०२/२०२३ रोजी रविवारी माजी नगराध्यक्ष अजय काका पाटील,माजी नगराध्यक्ष अमोल नाना शिंदे,प्रा.बटु पवार,मा.अँड गजानन खुजट,अभिजीत पाटील, बाळासो सावंत,स्वप्नील जाधव यांच्या उपस्थित पार पडला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.