प्रतिष्ठा न्यूज

‘स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडूंवरती अभिनंदनाच्या सरीवर सरी’

प्रतिष्ठा न्यूज/ किरण कुंभार
तासगांव : – सांगली जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडूंनी यशाची चौफेर फटकेबाजी करीत सांगली जिल्हा निवड चाचणीत अद्वितीय कामगिरी करीत यशाचा गौरव कलश आपल्या हाती घेतला. सांगली जिल्ह्यात स्वराज्य फौंडेशन एकमेव क्रीडा मंडळ ठरले की, इतक्या मोठ्या संख्येने राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड झालेले.खेळाडूंच्या यशाची बातमी ऐकताच तासगांव शहरातील क्रीडाप्रेमी नागरिक,पालक,सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून खेळाडूंवरती आणि स्वराज्य फौंडेशनच्या पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाच्या सरीवर सरी पडू लागल्या. एकाच वेळी वारंवार होणाऱ्या पावसाच्या सरी आणि स्वराज्य फौंडेशनच्या खेळाडूंची विविध स्पर्धा व निवड चाचणीतून होणारी यशस्वीता पाहून लोक अत्यानंदी झाले आहेत.राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा दि.१९ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०२४ अखेर बालेवाडी पुणे येथे होणार आहेत. सहभागी यशस्वी खेळाडू पुढीप्रमाणे
*१४ वर्षा खालील गट*
१) राही सूर्यवंशी :- ग्रुप सी – प्रथम क्रमांक
२) सुहाना जमादार :- ग्रुप बी – प्रथम क्रमांक
3) युवराज कदम :- ग्रुप बी – तृतीय क्रमांक

*१६ वर्षाखालील गट*
१) वैष्णवी माने :- ६०० मीटर धावणे,  पेंटॅथलॉन – प्रथम क्रमांक
२) वर्षा माने :- ८० मीटर अडथळा, उंच उडी – प्रथम क्रमांक
३) श्रावणी माने :- ६०० मीटर धावणे, लांब उडी – तृतीय क्रमांक
४) अथर्व पाटील :- ८० मीटर अडथळा, पेंटॅथलॉन – द्वितीय क्रमांक
५) अर्जुन लांडगे :- भालाफेक – तृतीय क्रमांक

*१८ वर्षाखालील गट*
१) अनुष्का चव्हाण :- ४०० मीटर धावणे – प्रथम क्रमांक, लांब उडी- तृतीय क्रमांक
२) मुबसिरा मुल्ला :- ३ किमी चालणे – प्रथम क्रमांक
३) कमला चौधरी:- १ किमी धावणे – द्वितीय क्रमांक
४) आयुष्का धोत्रे :- ४०० मीटर , १ किमी धावणे तृतीय क्रमांक

*२० वर्षाखालील गट*
१) सोफिया मुल्ला :- ५ किमी धावणे द्वितीय क्रमांक, १.५ किमी धावणे प्रथम क्रमांक.

       वरील सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अंकुश कलकुटगी सर नेहमीच मार्गदर्शन व सराव करून घेतात. फौंडेशनचे अध्यक्ष किरण माने म्हणाल, मुलांनो ! नियमित कष्ट आणि सराव केल्यास यश कसे मिळते हे तुम्ही दाखवून दिले. खेळाडूंना यशासाठी कोणतीही अडचण येवू दिली जाणार नाही. तालुका क्रीडा अधिकारी सौ. सीमा पाटील मॅडम ,वसंत थोरबोले, अभिजित कोळेकर, डॉ.सचिन सूर्यवंशी सदरच्या खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन देत असतात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.