प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज नारायणा अकॅडमीचे उत्तुंग यश!

प्रतिष्ठा न्यूज

मिरज प्रतिनिधी: गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल, मिरज येथील केंब्रिज नारायणा अकॅडमी मधील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थापक-चेअरमन पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते शाल व रोपटे देवुन सत्कार करण्यात आला व त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देत ते म्हणाले, अकॅडमीची दरवर्षीची उज्वल परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.  दरवर्षी प्रमाणे पुढील वर्षीचीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.  तरी विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश लवकरात लवकर निश्चीत करून घ्यावेत असेही ते यावेळी म्हणाले.

 

या यशात मुलांच्या अभ्यासातील रुची, परिश्रम व त्यांनी केलेले प्रामाणिक प्रयत्न व त्यांना मिळालेले केंब्रिज नारायणा अकॅडमीचे योग्य मार्गदर्शन फार मोलाचे ठरले आहे.

यावर्षी केंब्रिज नारायणा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे.

श्रुतिका पाटील, शिवम घुळी, वित्राग पाटील, क्षितिज पाटील, प्रथम कोळेकर, सादिया मुजावर,  नुमान जमादार, दर्शन चौगुले, जीशान मुलानी, रोहन जाधव या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत अकॅडमीची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे.

यावेळी केंब्रिज अकॅडमीचे संचालक हरे कृष्णा सर, प्रशासक रफिक तांबोळी सर, आदिनारायण सर, शिक्षक व पालक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.