प्रतिष्ठा न्यूज

काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस सेवा दलाने महाराष्ट्र व कामगारांची प्रतिष्ठा जपली : प्रा. एन.डी.बिरनाळे; सांगलीत काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि.३: भारताच्या व विशेषकरून महाराष्ट्र आणि राज्यातील कष्टकरी कामगार वर्गाच्या हितासाठी काँग्रेस व काँग्रेस सेवा दलाचे योगदान लक्षवेधी आहे. राज्यातील जनतेच्या चौफेर विकासात या दोन्ही यंत्रणेचा सहभाग लक्षणीय आहे. महाराष्ट्र आणि कामगारांची अस्मिता, अस्तित्व आणि प्रतिष्ठा जपणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी शिक्षक विभागाचे कार्याध्यक्ष प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी केले.ते काँग्रेस भवन येथे आयोजित काँग्रेस सेवा दल प्रशिक्षण शिबिराची शिबिरार्थ्यांना प्रमाणपत्रं वितरण समारंभात बोलत होते. अध्यक्षस्थानी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले होते.
सदरच्या शिबिराचे संयोजन शहर जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष पैलवान प्रकाश जगताप प्रदेश सचिव पैगंबर शेख सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी केले

प्रारंभी काँग्रेस भवन समोर सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले तसेच सांगली जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांचीही जयंती साजरी करण्यात आली. त्यानिमित्त त्यांच्या पुतळ्यास नवनिर्वाचित कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संग्राम पाटील व प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलचे कार्याध्यक्ष प्रा. एन डी बिरनाळे साहेब यांच्या हस्ते पुष्पहार व सुतिहार अर्पण करण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक संग्राम पाटील शशिकांत नागे व माजी उपमहापौर प्रशांत पाटील मजलेकर यांचे सत्कार करण्यात आले. तदनंतर दि. 30 एप्रिल व १ मे रोजी काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेले प्रशिक्षणार्थी यांना प्रमाणपत्र वाटप प्रा. एन डी बिरनाळे, वाळवा तालुक्याचे काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष जयवंत जाधव, सेवा दलाचे शहर जिल्हाध्यक्ष पै. प्रकाश जगताप अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष देशभूषण पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबगोंडा पाटील, ओबीसी सेलचे अशोक सिंग रजपूत यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी प्रा. एन डी बिरनाळे पुढे म्हणाले, ‘संयुक्त महाराष्ट्र निर्माण कामी अनेकांनी बलिदान दिले आहे.. महाराष्ट्र हा आपला स्वाभिमान आहे. ज्या ज्या वेळी भारत संकटात सापडला त्या त्या वेळी महाराष्ट्र दिल्लीच्या मदतीला धावून गेला. महाराष्ट्र हे राज्य संविधानाचा सन्मान करणारे राज्य आहे. कामगारांची प्रतिष्ठा जपणारे राज्य आहे. ही परंपरा कायम ठेवली पाहिजे. काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरामुळे अनुशासन मजबूत होऊन त्याचा फायदा पक्षाला होणार आहे. त्यामुळे अशी शिबीरे नियमितपणे होणे आवश्यक आहे. सांगली जिल्हा काँग्रेस सेवा दलाने हे शिबीर भरवून पक्षासाठी मोठे काम केले आहे.

जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी एक मे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन सांगली जिल्ह्याचे पहिले अध्यक्ष स्वामी रामानंद भारती यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली तसेच काँग्रेस सेवा दलाच्या स्थापनेपासून सेवा दलाची माहितीपर मार्गदर्शन केले
यावेळी स्वागत प्रास्ताविक पैलवान प्रकाश जगताप व शेवटी आभार मौलाली वंटमोरे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता सेवा दल शपथ व राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी प्रदेश सेवा दलाचे पैगंबर शेख जिल्हा काँग्रेस सचिव सचिन चव्हाण, राजू पाटील भिलवडी कवठेमंकाळचे अध्यक्ष पाटील, पलूस चे अध्यक्ष सुशांत जाधव प्रतीक्षा काळे, माजी सभापती नंदादेवी कोलप, मायाताई आरगे, पद्मावती पुजारी, अनिता बनसोडे, यंग ब्रिगेडचे चेतन पाटील, महेश शिंदे , सुनील गुळवणे, विद्या भोपळे वेदिका कळंत्रे, विठ्ठलराव काळे, नामदेव पठाडे, श्रीधर बारटक्के विश्वास यादव, सुरेश गायकवाड, राम सिंग परदेशी वसंतराव आरगे, सुरेश पाटील महेश शिकलगार किशोर भाई कुकरेजा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.