प्रतिष्ठा न्यूज

कुंडल वीरभद्र डोंगर पायथ्याला पाण्याच्या व्याकुळतेने हरणाचा दुर्दैवी मृत्यू

वन खात्याने वन्य प्राण्यांच्या कडे दुर्लक्ष केल्यास या ठिकाणी सागरेश्वर अभयारण्य होते हे सांगावे लागेल - ॲड दिपक लाड

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडल येथील वीरभद्र डोंगरपायथ्या शेजारी बुधवारी सायंकाळी सागरेश्वर अभयारण्यातील हरणाचा पाण्याअभावी व्याकुळतेने दुर्देवी मृत्यू झाला असल्याची माहिती वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे पुजारी यांच्याकडून रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष एडवोकेट दिपक लाड यांना समजली असता त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली व सागरेश्वर अभयारण्य प्रशासनास हरणाच्या मृत्यूबाबत माहिती कळवली.

या दरम्यान ॲड दिपक लाड यांनी बोलताना कळविले की सागरेश्वर अभयारण्यातील हरीण ,काळवीट या प्राण्यांची पाणी नसल्यामुळे ससेहोलपट झाली आहे, वाघ सिंह हत्ती इतकाच या प्राण्यांना देखील दर्जा आहे ,वन खात्यास कृत्रिम पानवट्यांची व्यवस्था करा या संदर्भात वारंवार सूचना करून देखील वनखाते याकडे दुर्लक्ष करत आहे.,, हे प्राणी म्हणजे आपले नैसर्गिक सौंदर्य व आपला अनमोल ठेवा आहे त्याचे जतन आपण करायला हवे.. असे ॲड दिपक लाड यांनी कळविले.

डोंगरावरील वन्य प्राण्यांना
पिण्यास पाणी नसल्याने व्याकुळ झालेले प्राणी डोंगरातील खाणीत साचलेले प्रदूषित पाणी पीत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर फार मोठा विपरीत परिणाम होत आहे.

सायंकाळच्या वेळी हरिण व काळवीट व वन्यप्राणी व्याकुळ होऊन कुंडलच्या शेताच्या व गावच्या दिशेने पाणी पिण्यासाठी येत असतात.

आजचे मृत्यू झालेले हरीण हे पाण्याअभावी मृत्युमुखी पडले असल्याचे डोंगर परिसरात फिरायला येणाऱ्या नागरिकांनी मत व्यक्त केले…

वन खात्याने मृत्यू झालेल्या तात्काळ या हरणाचे पंचनामे करावे व खुलासा करावा सागरेश्वर अभयारण्याने तात्काळ पानवट्याची व्यवस्था करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा रणसंग्राम सोशल फाउंडेशन च्या वतीने ॲड दिपक लाड यांनी दिला.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.