प्रतिष्ठा न्यूज

विराट निलेश घोरपडे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

प्रतिष्ठा न्यूज

मिरज प्रतिनिधी: रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, बेडग विद्यालयाच्या 11 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनामार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेमधुन इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेमध्ये प्रथम क्र. विराट निलेश घोरपडे 222 गुण पुढे अनुक्रमे अथर्व नागरगोजे 182, वरुण सानप 180, आरती नागरगोजे 178, यश लिंबीकाई 174, केतन सानप 156, आदिती सतिश घोरपडे 150, अजीम नांद्रेकर 146, रितेश ओमासे 140, श्रवण खाडे 138 सृष्टी चौगुले 134 गुण मिळवुन उत्तीर्ण झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री. पाटील सर शिक्षीका आडके मॅडम तसेच विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. विराट घोरपडे यास सलगरे येथील श्री. दिपक देशमुख सर यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.