प्रतिष्ठा न्यूज

रेव्याची वाडी येथे गुरुवारी शिवलिंग प्रतिष्ठापना

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.३० : रेव्याचीवाडी ( सैतवडे) ता. गगनबावडा येथे गुरुवार तारीख ४ मे रोजी शंभू महादेव शिवलिंग प्रतिष्ठापना सोहळा होत असून त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
बुधवारी तीन मे रोजी तीन वाजता ग्राम प्रदक्षिणा व मिरवणूक, सायंकाळी शिवलिंग बसविणे, आठ वाजता रेव्याची वाडी ग्रामस्थांचे संयुक्त भजन.
गुरुवारी ४ मे रोजी सकाळी साडेसहा वाजता पुरोहित यशवंत पाध्ये यांचे हस्ते सर्व धार्मिक विधी, सकाळी साडेनऊ ते अकरा प.पू. उंबरनाथ महाराज यांचे हस्ते शिवलिंग प्रतिष्ठापना, ११ वाजता महा अभिषेक, साडेअकरा वाजता महाआरती व मंत्रपुष्पांजली, दुपारी बारा वाजता डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग पडवळ यांचे हस्ते हॉलचे उद्घाटन, सव्वा बारा वाजता महिलांचा हळदीकुंकू व माहेरवाशीन ओटी भरणे कार्यक्रम, दुपारी एक वाजता महाप्रसाद,, दोन वाजता लखमापूर भजनी मंडळ व बुवाची वाडी भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम. पाच वाजता सद्गुरु रामचंद्र कदम महाराज शिष्यांचे भजन. रात्री आठ वाजता ह.भ.प. वास्कर महाराज यांचे अधिपत्याखाली ह.भ. प. रामचंद्र पारगावकर यांचे मार्गदर्शनाखाली किर्तन सोहळा. कीर्तनकार ह.भ.प उत्तम पाटील महाराज (मिरज) हे करणार आहेत.
असे शंभू महादेव व्यवस्थापन कमिटी रेव्या ची वाडी कळवितात.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.