प्रतिष्ठा न्यूज

पळसंबे (ता.गगनबावडा) येथील बंधाऱ्याचा पिलर कोसळल्याने अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
कोल्हापूर,ता.१० : पळसंबे (ता.गगनबावडा) येथील कुंभी नदीवर कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा एक खांब रविवारी पहाटे कोसळल्याने असळज पळसंबे रस्ता तात्काळ अवजड वाहतुकीसाठी रस्ता बंद करण्यात आला आहे.अवजड वाहतूक बंद झाल्याने नागरिकांना व पर्यटकांना गैरसोईस तोंड द्यावे लागणार आहे. पळसंबे येथील रामलिंग तिर्थक्षेत्र असल्याने अनेक भाविक या ठिकाणी येतात. याशिवाय नाळेवाडी,चाफेवाडी,पेजलेकरवाडी,पळसंबे या वाड्या वस्तीमधील नवीन घर बांधणाऱ्या नागरिकाना वाहतूक करण्यास मोठी अडचण येत असून,वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
आता नागरिकांना घरे बांधण्यास किंवा शेतीच्या कामासाठी वाहतूक करावयाची झाल्यास काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याबाबत पाटबंधारे विभागाने पळसंबे पाटबंधारे ची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थामधून होत आहे.

शासनाने व पाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून सदर ठिकाणी उंच पूल बांधून नागरिकांना रस्ता पूर्वत करावा. व नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी.
– सौ.वैशाली संदीप गावकर (सरपंच ग्रुप ग्रामपंचायत असळज, वेसरफ, पळसंबे)

 

दुरुस्ती बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरवठा केला
पावसाळ्यांनंतर पळसंबे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधारा दुरुस्तीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे. व त्याचा पाठपुरावा करत आहे. त्याबाबत कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग यांनीही बंधाऱ्याची पाहणी केली आहे.
– अजिंक्य पाटील (अभियंता, पाटबंधारे विभाग, कळे )

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.