प्रतिष्ठा न्यूज

श्रीमती आ रा पाटील कन्या महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाच्या वतीने विशेष भित्तिपत्रिकेचे उद्घाटन

प्रतिष्ठा न्यूज
इचलकरंजी प्रतिनिधी : राज्यशास्त्र विभागाच्या वतीने श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालय, इचलकरंजी येथे भारतीय लोकशाहीची यशस्वी वाटचाल NDA विरुद्ध INDIA… या विषयावरती भित्तित्रिकेचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थिनींनी भारतीय लोकशाहीची यशस्वी वाटचाल या अनुषंगाने सध्य परिस्थितीतील एनडीए विरुद्ध इंडिया या दोन तगड्या पक्षांबद्दल सविस्तर माहितीचे संशोधन करून इतर सर्व विद्यार्थ्यांनी साठी उपयोगी पडेल अशा एका विशेष भितीपत्रिकेची तयारी केली.

या भित्तीपत्रिकेचे प्रमुख उद्घाटक म्हणून प्राचार्य डॉ. बाबासाहेब दुधाळे यांनी या भित्तिपत्रिकेचे उद्घाटन केले .
त्यावेळी बोलताना त्यांनी विद्यार्थिनींच्या या विशेष उपक्रमाचे कौतुक केले.
ते म्हणाले, खरं तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला भारतीय राज्यघटनेच्या स्वरूपात एक दैदिप्यमान असा इतिहास दिला,लोकशाही दिली, अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं,

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, महत्त्वाचं म्हणजे स्वतःचं मत मांडण्याची ताकद त्यांच्याकडे आहे याची जाणीव माणसाला झाली.
त्यामुळे आपण आपली लोकशाही बळकट करण्यासाठी आपल्या अधिकारांचा वापर केला पाहिजे, असे ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाचे संपूर्ण संयोजन आणि विद्यार्थिनींना मार्गदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. वर्षा पोतदार आणि डॉ मनोज जाधव यांनी केले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कु. रेश्मा मैर हिने केले तर सूत्रसंचालन कु. आरती मोरे हिने केले,तर कु.सना जमादार हिने आभार व्यक्त केले.

यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.