प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांच्या विजयासाठी संघ परिवारही दक्ष योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि.२४: सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांच्या विजयासाठी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झटून काम करीत आहेत. त्याचवेळी संघ परिवारातील सर्व संघटना व संस्थांचे पदाधिकारी, सदस्यही काकांच्या विजयासाठी दक्ष व सज्ज झाले आहेत. त्यांनी त्यांच्या पद्धतीनुसार व परंपरेनुसार प्रचार मोहिमेला गती दिली आहे.
संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे प्रभावी नेते योगी आदित्यनाथ, महामार्गांच्या कामामुळे संपूर्ण देशभर नावलौकिक मिळवलेले प्रभावी वक्ते ना. नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांगली जिल्ह्यासह राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या सभा सांगली मतदारसंघात होणार आहेत.सभांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होईल.
भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे प्रत्येक विधानसभा मतदारसंघवार प्रचाराचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा पाटील, नेते मकरंदभाऊ देशपांडे, माजी जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पक्षाचे नेते शेखर इनामदार आदी नेते प्रचाराचे नियोजन करीत आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून, प्रसंगी काहींची समजूत काढून त्यांच्याशी चर्चा करून प्रचाराला गती देत आहेत. मकरंदभाऊ देशपांडे एकीकडे प्रचाराचे नियोजन करीत असतानाच मतदानाच्या दिवसासाठीही पक्षीय पातळीवर तयारीचा आढावा घेत आहेत.
सांगली विधानसभा मतदारसंघात आमदार सुधीरदादा गाडगीळ, प्रकाश ढंग, शेखर इनामदार यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली आहे. मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचाराची मोहीम सुरू आहे. तेथील नगरसेवकांची प्रकाश ढंग यांनी बुधवारी बैठक घेतली. त्यानंतर संजयकाकांच्या विजयासाठी कसून प्रयत्न करण्याचा निर्णय नगरसेवकांनी जाहीर केला.
जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे नेते व प्रभावी वक्ते डॉ. रवींद्र आरळी, सांगली बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे, सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमन्गोंडा रवी संजयकाकांच्या प्रचारात आघाडीवर आहेत. याशिवाय आमदार गोपीचंद पडळकर हे खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघाबरोबरच जत विधानसभा मतदारसंघातही प्रचाराची बाजू सांभाळत आहेत.
तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे शेकडो कार्यकर्ते प्रचाराचे रान उठवीत आहेत. युवा नेते आणि तासगाव -कवठे महांकाळ विधानसभा मतदार संघप्रमुख प्रभाकरबाबा पाटील, संजयकाका पाटील यांच्या सुविद्य पत्नी सौ. ज्योतीताई पाटील, संजयकाकांच्या कन्या वैष्णवीताई पाटील याही प्रचार मोहिमेत आघाडीवर आहेत.
खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर,जिल्हा परिषदेचे माजी उपसभापती सुहासराव बाबर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. सांगलीत झालेल्या सभेत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संजयकाकांना मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नामदार फडणवीस यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवत सुहासराव बाबर प्रचारास गती देत आहेत. विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभवदादा पाटील हे माजी आमदार सदाशिवरावभाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाने संजयकाकांच्या प्रचार मोहिमेत सहभागी आहेत. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख,ब्रह्मानंद पडळकर,हर्षवर्धन देशमुख ,युवा मोर्चाचे अनिल पाटील यांनीही काकांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे.
पलूस -कडेगाव विधानसभा मतदारसंघात सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रचार मोहिमेची पद्धतशीर आखणी केली आहे. संग्रामसिंह देशमुख सर्व मतदारसंघात फिरून प्रचाराला गती देत आहेत. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत आहेत. संग्रामसिंह देशमुख सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य यांच्या सतत संपर्कात आहेत. त्यांच्याही बैठका घेत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकूणच केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयामुळे संघ परिवारातील सर्व संस्था आणि संघटना समाधानी आहेत. त्यामुळे त्यांनी भारतीय जनता पक्ष महायुतीच्या प्रचारात मोठा पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठीक ठिकाणी नागरिकांना भेटत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार केंद्रात पुन्हा येण्यासाठी मदत करावी, भारतीय जनता पक्ष महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अशी विनंती करीत आहेत.
याचवेळी संघ परिवारातील इतर काही संस्थांतर्फे सांगली, मिरज, विटा, तासगाव, जत, कवठेमहांकाळ, पलूस या शहरातील विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या छोट्या छोट्या बैठकाही घेतल्या जात आहेत. बैठकांचे नियोजन युवा नेते विशाल गायकवाड, नरेंद्र येरगट्टीकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर वनखंडे करीत आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.