प्रतिष्ठा न्यूज

राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे 2023 – 24 च्या संचमान्यतेनुसार समायोजन करावे – शिक्षक सेनेची मागणी

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :  शिक्षक संख्येचे शाळानिहाय संतुलन निर्माण करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षे 2023-24 ची संच मान्यता ग्राह्य धरावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष- ज.मो.अभ्यंकर यांनी महाराष्ट्र शासनाचे ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण यांनी दिली.
पुढे निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक संख्येचे निर्धारण करताना 2023-24 च्या पट संख्येनुसार केलेल्या संच मान्यते नुसार केलेल्या संच मान्यता प्रमाणे शिक्षकांना अतिरिक्त ठरवून रिक्त जागेवर त्यांचे समायोजन केल्यास 23-24 मध्ये वाढीव विद्यार्थी संख्या असुन ही 23-24 च्या कमी संख्येमुळे तेथील शिक्षक अतिरिक्त ठरतील व  समावेशन केलेल्या ठिकाणी 23-24 पेक्षा विद्यार्थी संख्या 23-24 मध्ये कमी झाली असल्यास समावेशातील शाळेत ते पुन्हा अतिरिक्त ठरतील तेव्हा सदरील परिस्थिती लक्षात घेऊन 23-24 मधील विद्यार्थी संख्येला अनुरूप शिक्षक संख्या संतुलनाची प्रक्रिया पार पडेल असे महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने राज्याध्यक्ष- ज.मो.अभ्यंकर यांनी नमूद केले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्य उपाध्यक्ष- विठुभाऊ चव्हाण यांनी दिली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.