प्रतिष्ठा न्यूज

आम आदमी पक्षामार्फत सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करणेबाबत महाराष्ट्रभर स्वराज्य फेरीचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : आम आदमी पक्षामार्फत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधून दि. २८ मे २०२३ ते ६ जून २०२३ अखेर सर्वसामान्य लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करणेबाबत स्वराज्य फेरी हि  श्रीक्षेत्र पंढरपूर ते किल्ले रायगड पर्यंत निघणार आहे. यात्रेच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्यांमधून हि यात्रा पोहचणार आहे. दि.३० मे २०२३ ते ३१ मे २०२३ दरम्यान सदर यात्रा सांगली-मिरजेत असणार आहे.  सदर यात्रेत महाराष्ट्रातून  पक्षाचे  असंख्य कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी श्री.गोपाल इटालिया यांनी या यात्रेची संकल्पना मांडली आहे. गुजरात मधील सुरत येथील महानगरपालिका निवडणुकीत श्री. गोपाल इटालिया यांनी आपल्या रणनीतीने आम आदमी पार्टीचे तब्बल २७ नगरसेवक निवडून आणले तसेच विधानसभा निवडणुकीत  त्यांनी आपल्या कौशल्याने आम आदमी पार्टीचे ५ आमदार निवडून आणून एक चमत्कार घडविला आहे. महाराष्ट्रात आम आदमी पार्टीला उज्वल भविष्य असून श्री. गोपाल इटालिया यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी महानगरपालिका, विधानसभा, लोकसभेसहित सर्व प्रकारच्या निवडणुकीत जोमाने उतरणांर आहे. लवकरच सांगली, कोल्हापूर व सोलापूर शहरात महानगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजणार आहेत व त्याची सुरवात म्हणजेच हि यात्रा असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे राज्य ज्याप्रमाणे रयतेला समर्पित होते त्याच प्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडविण्याचा आम आदमी पार्टीचा मानस आहे.
सदर यात्रा मिरजेत ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी पोहचणार आहे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून सराफकट्टा मार्गे मिरज मार्केट येथून ख्वाजा मीरासाहेब यांच्या मझारीला चादर चढवून हि यात्रा किसान चौकात संध्याकाळी ७ वाजता पोहचेल. किसान चौकात पक्षाच्या वतीने एका मोठ्या सभेचे आयोजन  केले असून सदर सभेस मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता पक्षाच्या आयोजकांनी वर्तवली आहे. सभेनंतर सर्व कार्यकर्त्यांची राहण्याची व भोजनाची सोय सांगली जिल्हा शहर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हि यात्रा विश्रामबाग, राम मंदिर, स्टेशन चौक, राजवाडा चौक मार्गे एस.टी.स्टॅन्डला पोहचणार असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ एक कॉर्नर सभा घेण्यात येणार आहे व त्यानंतर हि यात्रा कोल्हापूरकडे कूच करणार आहे.
सदर यात्रेसाठी वसीम मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा शहर समितीचे अध्यक्ष अरिफ मुल्ला, उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, निसार मुल्ला, सह सचिव संतोष मगदूम, संघटक फय्याज सय्यद, रवी बनसोडे, झोहेब मुल्ला, राम कोकरे, श्रीकांत चंदनवाले, तौफिक हवलदार, संदीप कांबळे, संजय साबळे, लालासाहेब मणेर, राजू माळी, दिलीप रेणके ख्वाजा जमादार तसेच  आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे जिल्ह्या अध्यक्ष संभाजी मोरे, सचिव इमरान पठाण, सतीश सौन्दडे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन यात्रेची पूर्वतयारी केली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.