प्रतिष्ठा न्यूज

संभाजी ब्रिगेड-शिवसेना महाविकास या समविचारी पक्षाचा झेंडा नांदेड मध्ये फडकवू- सुधीर देशमुख

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : संभाजी ब्रिगेड -शिवसेना महाविकास आघाडीतील पक्ष समविचारी संघटनांना सोबत घेऊन नांदेड मध्ये संभाजी ब्रिगेडचा झेंडा फडकवू-प्रदेश कार्याध्यक्ष सुधीर देशमुख
येथील यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वस्तीगृह येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष- सुधीर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी ब्रिगेड सक्षमीकरण दौऱ्याची बैठक संपन्न झाली. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व जिजाऊ वंदना घेऊन सक्षमीकरण बैठकीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक- प्रा.प्रेमकुमार बोके, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक- संतोष शिंदे, प्रदेश संघटक- इंजि. मनोज गायकवाड, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष- सुभाष पाटील कोल्हे, भगवानराव कदम, परमेश्वर पाटील, सचिव- कमलेश कदम, दशरथ कदम, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख- बालाजी सिरसाट, अशोक कदम, मारोती मेंढेवाड, तालुकाध्यक्ष- मोहन शिंदे, सचिन कदम, योगेश मोरे, विठ्ठल भिसे, विकास लुंगारे, सतिश व्यवहारे, कैलास पवळे, अंकुश कोल्हे, बालाजी देशमुख, परमेश्वर खोसे, ज्ञानेश्वर शिंदे, अनिल कदम, गोविंद गाडे, परसराम कदम, स्वप्निल शिंदे, ओम पुरी, स्वप्निल पांचाळ, सुधाकर पाटील, ज्ञानेश्वर हंगरगे, यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे जिल्हा, तालुका, शाखा प्रमुख व पदाधिकारी कार्यकर्ते आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.