प्रतिष्ठा न्यूज

गवे भर दिवसा कळपाने गगनबावड्यात.. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा :  गवे आता भर दिवसा गावातील रस्त्यावर फिरू लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.  आज गगनबावडा कोल्हापूर महामार्ग वरून गगनबावड्यातील  तोडकर हॉस्पिटल जवळून  जाताना पंधरा ते वीस गव्यांच्या कळपांचे नागरिकांना दर्शन झाले. गगनबावडा तालुक्यात गव्याचा वावर वाढल्याचे दिसत आहे.
गवे शेतीचे प्रचंड नुकसान करतात. यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रकाश पाटील आणि अन्य यांनी गेल्याच महिन्यात रास्ता रोको करून वन खाते आणि शासनाला जाब विचारले होते. त्याचे फलित म्हणून प्रथम काही गावांना सौर कुंपण मंजूर झाले आहे.असे त्यांच्याशी संपर्क साधला असता सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.