प्रतिष्ठा न्यूज

सावळजच्या शिरपेचात मानाचा तुरा : सावळजची कन्या सुजाता कांबळे हिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड

प्रतिष्ठा न्यूज/ अनिल शिंदे
सावळज दि. 23 : घरची परिस्थिती अतिशय बेताची असताना, अत्यंत खडतर परिस्थितीत केवळ आई वडिलांच्या खंबीर पाठिंब्यामुळे सावळज येथील सुजाता समजिक कांबळे हिची तालुका कृषि अधिकारी पदी निवड झाली आहे.
अतिशय गरीब परिस्थितीतून केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिने उतुंग भरारी घेत हे यश संपादन केले आहे,त्यामुळे सावळज च्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून सावळज सहित परिसरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे, सावळज येथील द्राक्षशेती, व कामाची आवड असलेल्या कुटुंबात सुजाताला याबाबत प्रोत्साहन लाभले, वडिल शेतीची कामे करतात हे पाहून तिने वडिलांच्या पासून प्रेरणा घेतली, लहानपणापासूनच ती हुशार होती तीचे प्राथमिक शिक्षण सावळज येथील जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेत झाले त्यावेळी तीला शिक्षिका शारदा चव्हाण, सुमन पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, उच्चशिक्षण व शेती विषयाची आवड असल्याने पुढील शिक्षण कृषी महाविद्यालय कराड येथे झाले, सध्या राहुरी येथे वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या पदव्युत्तर दुसऱ्या वर्गात शिकत आहे शिक्षण घेत असताना तिने एम पी एस सी ची परीक्षा दिली त्यामध्ये तिची तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे.
तिच्या या निवडीमुळे सावळज व परिसरातून तिचे कौतुक होत आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.