प्रतिष्ठा न्यूज

हजारो सांगलीकरांच्या उपस्थितीत मारुती चौकात पार पडला शोले इव्हेंट: विजयंता मंडळाकडून आयोजन : शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण आणि टीमकडून सादरीकरण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : सांगलीतील मारुती चौकात गब्बर सिंग, बसंती, जेलर यांच्यासह शोले मधील अनेक सीन हुबेहूब पाहण्याची संधी विजयंता मंडळाकडून एकभारत श्रेष्ठ भारत अंतर्गत आणि महाराष्ट्र गुजरात स्थापना दिनानिमित्त सांगलीकर जनतेला उपलब्ध करून देण्यात आली. शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण निर्मित आणि सोनाली केकडे प्रस्तुत शोले कार्यक्रमास रसिक प्रेक्षकांच्या भरभरून प्रतिसाद मिळाला.
मारुती चौकातील भव्य व्यासपीठावर शोले स्टाईल पत्रकार दीपक चव्हाण यानी गणेश वंदना सादर केल्यानंतर ए शाम मस्तानी सिंगिग ग्रुपच्या कलाकारांनी सुरवातीला बच्चन हिट्स कराओके गाण्यांचा कार्यक्रम सादर केला. यामध्ये दीपक चव्हाण, सोनाली केकडे, मिलिंद बनसोडे, विनोद साळुंखे सुहास फडतरे आदी गायकांनी कराओके ट्रॅकवर गाणी सादर केली. यानंतर भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्याहस्ते शोले इव्हेंटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपाचे प्रदेश सचिव पैल. पृथ्वीराज पवार, युवा नेते गौतम पवार, भाजपाच्या गटनेत्या भारती दिगडे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले, नगरसेवक राजेंद्र कुंभार, गजानन मगदूम, बटूदादा बावडेकर, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, माजी नगरसेविका शालन चव्हाण, भाजपा नेते अविनाश मोहिते, उदय मुळे, विजयंता मंडळाचे अध्यक्ष विलास शिंदे, शलाका पवार, उदय बेलवलकर, भाजपा महिला मोर्चा ग्रामीण उपाध्यक्षा स्मिता पवार, रेखा पाटील, याचबरोबर अहम चित्रपटाचे कलाकार मृणाल कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा उपस्थिती लावत संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी पैलं. गौतम भैय्या पवार यांच्यासाठी दीपक चव्हाण यानी तेरे जैसा यार कहा हे गीत सादर करताच अनेकांचे डोळे पाणावले. यानंतर शोले इव्हेंटची सुरवात अविनाश शितोळे यांच्या माऊथ अर्गण धूनने करण्यात आली. यानंतर जेलर च्या भूमिकेत असणाऱ्या आरिफ शेख यांच्या दमदार एन्ट्रीने कार्यक्रमाची रंगत वाढली. याचबरोबर गब्बर सिंगची भूमिका बजावणारे महमदरफिक भालदार यानी घोड्यावरून एन्ट्री घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर खास आकर्षण असणारी सोलापूर आयडॉल तेजश्री गायकवाड हिने बसंतीच्या भूमिकेत खास टांग्यामधून एन्ट्री करीत सर्वांची मने जिंकली. यानंतर तब्बल दीड तास शोले मधील अनेक फेमस सीन, डायलॉग याने मारुती चौकाचे रूपांतर काहीकाळ रामगडमध्ये झाले होते. या शोले इव्हेंट मध्ये दीपक चव्हाण, सोनाली केकडे, सुहास फडतरे यानी गाण्यांचे बहारदार सादरीकरण केले. यामध्ये जयची भूमिका दीपक चव्हाण यानी तर विरूची भूमिका आयुब ऐनापुरे यानी साकारली. ठाकूरची भूमिका गुरुजींनी साकारली तर सांबाची भूमिका विनोद साळुंखे यानी साकारली. डाकुची भूमिका मिलिंद बनसोडे, रुपेश चंदनशिवे, सुहास फडतरे यानी तर जेलरच्या पोलिसांची भूमिका पवन वळीव आणि यश पेटकर यानी साकारली. ठाकूरच्या बहुची भूमिका पूर्वा केकडे हिने साकारत सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमात सांगलीतील नवोदित डान्सर प्राजक्ता वाघमारे हिने अनेक नामवंत गाण्यावर नृत्य सादर करीत सर्वांची मने जिंकली. रविवारी सायंकाळी तब्बल तीन तास संपन्न झालेल्या शोले इव्हेंटमुळे सांगलीकर जनतेला सांस्कृतिक मेजवानी मिळाली. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामचंद्र देशपांडे, विजय साळुंखे, रवी वादवणे यांच्यासह विजयंता मंडळाच्या सर्व पदाधिकारी, सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. याचबरोबर टेक्निकल टीम म्हणून गिरीश लोहना, नवीन संबोधी, गणेश चव्हाण, नारायण कारंडे, राहुल चव्हाण, ओम चव्हाण यानी तर शरद शहा यांच्याकडून सतीश नांद्रेकर यांनी बहारदार अशी ध्वनी यंत्रणा लावली होती. या बहारदार कार्यक्रमामुळे मारुती चौक कित्येक वर्षानंतर गर्दीने फुलून गेला होता. या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल विजयंता मंडळाचे सांगलीकर नागरिकांनी आभार मानले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.