प्रतिष्ठा न्यूज

बेरळी बु ता मुखेड येथे वैकुंठवासी संत उमराव महाराज यांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी

प्रतिष्ठा न्यूज / राजू पवार
नांदेड दि.8 : मौजे बेरळी ( बु) ता.मुखेड येथे वै.हभप उमराव महाराज यांची पुण्यतिथी उत्साहाने साजरी करण्यात आली. वै.हभप.उमराव जळबा पाटील वडजे ( महाराज) हे विठ्ठलाचे नि:सिम भक्त होते. ते संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज,संत एकनाथ महाराज,संत गाडगेबाबा यांना आदर्श मानत असत. त्यांनी कौठा, पेठवडज,मुखेड येथे संत गाडगेबाबा यांचे किर्तन ऐकले होते. त्यांच्या जीवनावर प्रभाव पडला आणि त्यांनी दररोज पहाटे 4:00 वाजता किर्तनास सुरूवात करीत असत. टाळ,चिपळ्या,विणा हे त्यांचे किर्तनाचे साधन होते. दैनंदिन जीवनातील, व्यवहारातील सामान्य उदाहरणे देऊन समाज प्रबोधन करीत होते.सामान्य लोकांना समजेल असे सहज, सोपे,सुलभ, बोली भाषेतून किर्तन केले.
बेरळी (बु) ते पंढरपूर पायी वारी करणारे निष्ठावंत वारकरी म्हणून ज्यांचे नावलौकिक आहे असे कै. उमराव जळबा पाटील वडजे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
काय सांगू आता संतांचे उपकार ! मज निरंतर जागवित !
काय द्यावे त्याची व्हावे उत्तराई ! ठेवितो हा पायी जीव थोडा !सहज बोलणे हित उपदेश !
करुनी सायास शिकविती!
तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती !तैसे मजा येते सांभाळीत !
उमराव पाटील वडजे यांच्या जीवनचरित्रांबद्दल कितीही बोलले तर थोडकेच त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आठ्ठास किंवा आटापिटा ह्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये दुय्यम स्थानीच होत्या सहज जरी बोलले तरी तो एक अर्थ पूर्ण सल्ला, संदेश, अशी त्यांची वाणी होती.
पहाटे पाच वाजता उठून पायाखाली घोंगडे घेऊन चांगले वागा, प्रमाणिक राहा, आपल्यापासून इतरांना त्रास होणार नाही. याची दक्षता घ्या, प्रमाणिकपणा, इमानदारी हीच ईश्वराची प्राप्ती आहे. असे ओरडून सांगणारे उमराव पाटील यांना पाच मुली व दोन मुले हे सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असून त्यांचे दोन्ही मुले नामवंत कीर्तनकार आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे ह.भ.प.मा.सरपंच. बालाजी उमराव पा.वडजे व ह.भ.प. प्राध्यापक. सहदेव महाराज वडजे यांनी सुद्धा आपलं अख्ख आयुष्य वारकरी संप्रदायामध्ये आपले नाव लौकिक केले. एवढेच नव्हे तर दुष्काळ,गरीब परिस्थितीत त्यांनी आपल्या संसार कडे लक्ष दिले. त्यांच्या कन्या,मुली त्यांना “दादा” म्हणून हाक मारीत असत.
उमराव पाटील वडजे यांच्याकडे पाहताच निष्ठावंत वारकरी या शब्दाची अनुभूती होते त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या तत्त्वांमध्ये खोटे बोलणे इतरांना त्रास देणे या गोष्टी कधी घडल्याच नाहीत प्रापंचिक जीवनामध्ये सत्कार्य व भावभक्ती याशिवाय इतर बाबींना अनन्यसाधारण महत्त्व देऊन आपले प्रापंचिक जीवन सार्थकी लावले.
जाकापूर ता.कंधार जी.नांदेड येथील शैक्षणिक क्षेत्रामध्ये नावाजलेलं नाव म्हणजे हनुमंत भीमराव पवार गुरुजी हे त्यांचे जावई व वारकरी संप्रदायामध्ये संस्कृत साहित्याचा महामेरू, ज्ञानेश्वरी पारायणकार हरिभक्त म्हणून, उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून स्वर संवाद म्हणून ज्यांची ओळख आहे असे ह.भ.प. सदाशिव महाराज केदारवडगावकर हे सुद्धा त्यांचे जावईच एकंदरीत संपत्तीपेक्षा संततीकडे जास्तीचं लक्ष देणारे हभप श्री बालाजी पाटील वडजे यांनी मागील तीस वर्षापासून त्रयोदशीला त्यांची पुण्यतिथी करून संतांची सेवा घडावी… बाईलेकिन चा आशीर्वाद भेटावा… यासाठी दरवर्षी अन्नदान करून उमराव जळबा पाटील यांची पुण्यतिथी साजरी करतात त्यांच्या या कर्तुत्वाला प्रतिष्ठा न्युज,टीम नांदेड कडून साष्टांग दंडवत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.