प्रतिष्ठा न्यूज

कंधार, लोहा, मुखेड तालुक्यातून हजारो लोक भारत जोडो यात्रेत सहभागी होणार : नांदेड जिल्ह्यात यात्रेचे उत्स्फुर्तपणे स्वागत

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड दि.7 : नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील छ.शिवाजी महाराज यांच्या स्मारक,नगर परिषद जवळील ठिकाणी सायंकाळी काँग्रेस युवा नेते,खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचे उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले. खा.राहुल गांधी यांनी छ.शिवजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळयांस पुष्पहार अर्पण केला. तसेच घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यात्रेचे काँग्रेस चे जेष्ठ नेते श्री एच. के. पाटील, संपतकुमार, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष जेष्ठ नेते श्री नाना पटोले, माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण,जेष्ठ नेते माजी मंत्री,खा.भास्करराव पाटील खतगावकर,माजी मंत्री श्री डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजुरकर, आ.मोहणराव हंबर्डे, माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण, आ.माधवराव पाटील पवार, माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, आ. जितेश अंतापूरकर, श्री रवींद्र पाटील चव्हाण,श्री दिलीप पाटील बेटमोगरेकर,डॉ. पा.खतगावकर,महापौर जयश्री निलेश पावडे यांनी यात्रेचे स्वागत केले.
पदयात्रा वन्नाळी या गावाकडे प्रयाण करणार आहे.तसेच रात्री ठिक 11:00 वाजता यात्रा गुरूद्वारा यादगार साहिबजादे बाबा जोरावरसिंघजी,बाबा फतेहसिंघजी,वन्नाळी येथील गुरूद्वारा येथे यात्रेचे आगमन,होणार आहे. तसेच राहुल गांधी यांच्या हस्ते गुरुनानक देवजी यांची गुरुपुरब अरदास करण्यात येणार आहे.
तसेच यात्रेच्या, यात्रेकरूंच्या स्वागतासाठी माजी खा.भास्करराव पाटील खतगावकर यांनी शंकरनगर ( रामतीर्थ) येथे जय्यत तयारी केली आहे.मंगळवारी दि.8 नोव्हेंबर रोजी वन्नाळी गुरूद्वारा येथून सकाळी ठिक 7:30 वाजण्याच्या दरम्यान पदयात्रेस प्रारंभ होणार आहे.दुपारी वझरगा येथे काही काळ विश्रांती राहणार आहे.तर दुपारी ठिक 3:00 वाजता खतगाव फाटा येथून यात्रेस प्रारंभ होणार आहे.सायंकाळी ठिक 5:30 वाजता मोजे भोपाळा येथे पोहचल्यानंतर राहुल गांधी तेथे कार्नर बैठक घेणार आहेत..तसेच दि.9 नोव्हेंबर बुधवारी रोजी सकाळी ठिक 5:45 वाजता पदयात्रेस प्रारंभ होणार आहे. दुपारचा वेळ नायगाव येथे राखीव असेल. यात्रेतील यात्रेकरूंना ओळखपत्र देण्यात आली आहेत. यावेळी पोलीसांचा मोठा बंदोबस्त राहणार आहे.
दरम्यान कंधार, लोहा, मुखेड तालुक्यातून, कौठा, बारूळ,पेठवडज,कुरूळा भागातून हजारो कार्यकर्ते, जनता, युवक, स्त्री- पुरूष पदयात्रेत सहभागी होणार आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.