प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्ह्यात गुरुवारी वादळीवा-यासह सततधार पाऊस: जनजीवन विस्कळीत: पिकांचे प्रचंड नुकसान

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार
नांदेड दि.5 : नांदेड जिल्ह्यात , गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह सततधार पाऊस पडला. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. चोहीकडे पाणीच पाणी झाले असून रस्त्यावर चिखलच चिखल झाला आहे.वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.वातावरणातील तापमान 31.20 अंश सेल्सिअस इतके खाली आले आहे.
मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाने कहर केला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .सोमवारी सायंकाळी नांदेड शहरासह नायगाव, लोहा, मुखेड, कंधार, लोहा, बिलोली, देगलूर, मुदखेड, भोकर, अर्धापूर, मुदखेड, हदगाव, किनवट, हिमा भागातही मुसळधार पाऊस झाला तसेच काल गुरूवार दि.4 मे रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला असून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सततधार पावसाने विशेषतः भाजीपाला फुल शेती यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे उन्हाळी हंगामातील अनेक पिकांचे नुकसान झालेले आहे. वादळी वाऱ्यासह जिल्ह्यात गेल्या 15 दिवसापासून गारपीट,मुसळधार पावसाने, अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. उन्हाळी आणि बागायती पिके आडवी झालेली आहेत गेल्या पंधरा दिवसापासून मुसळधार सतत धार पाऊस पडत असल्याने शेतकरी हैराण झाला आहे. विशेषतः केळीच्या बागा पपईच्या बागा फुल शेती ( झेंडू,गलांडे) गारपिटीने नष्ट झाली आहेत. तसेच अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील झाडावरील आंबे वादळ वाऱ्यामुळे गळून गेली असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे कारण कच्चे आंबे बाजारामध्ये कवडीमोल भावानी विकली जात असतात . सोसाट्याच्या वादळी वाऱ्याने आंबे, मोसंबी, चिकू इत्यादी फळे गळून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आला आहे. अनेकांच्या घरावरील पत्रे सुद्धा उडालेले आहेत. तसेच उन्हाळी पिके ज्वारी ,मका ,हळद,भुईमूग, मका,सोयाबीन,ऊस, आदि पिके मातीमोल झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यावर अस्मानी नैसर्गिक आर्थिक संकट आलेले आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.