प्रतिष्ठा न्यूज

तासगावात मूक पदयात्रा काढून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मासाची सांगता..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांनी हिंदू धर्माकरिता आणि स्वराज्याकरिता सर्वोच्च बलिदान दिले,या आपल्या राजाबद्दल कृतज्ञता म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचें संस्थापक श्री.संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेले 30 दिवसांचे  बलिदान मास शिवभक्तांनी पाळले होते,त्याची सांगता आज मूकपद यात्रेने झाली.श्री संभाजी महाराजांना कैद केल्यानंतर 1 महिना त्यांच्यावर अमानुष अत्याचार करून फाल्गुन अमावस्येच्या दिवशी औरंगजेबाने त्यांची हत्या केली,त्यावेळी श्री संभाजी महाराजांची अंत्ययात्रा निघाली न्हवती,म्हणून आज मूक पदयात्रा काढून महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.ध्वजपूजन आणि प्रेरणा मंत्र होऊन मुकपदयात्रा *शिवतीर्थ* येथून सुरु होऊन शहरातील गुरुवार पेठ,गणपती मंदिर,पोस्ट ऑफिस,सिद्धेश्वर रोड,स्टॅन्ड चौक या मुख्य रस्त्यावरून नेण्यात आली.या पदयात्रेत मोठ्या संख्येने शिवभक्त सहभागी झाले होते.यावेळी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज सूर्यह्रदय,व ध्येयमंत्र घेऊन समारोप करण्यात आला.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.