प्रतिष्ठा न्यूज

वासुंबेत जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव :ग्रामपंचायत वासुंबे यांच्या वतीने जिल्हा परिषद मराठी शाळा वासुंबे येथे जागतिक महिला दिनानिमित्त गावातील ज्या महिलांना    एकच मुलगी अथवा दोन मुली आहेत अशा महिलांचा साडी,चोळी व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर गावातील आदर्श माता,आदर्श पत्नी,मराठी शाळेमधील शिक्षिका,गावातील आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका,ग्रामपंचायत कर्मचारी महिला,ग्रामपंचायत सदस्या, गावातील समाजसेविका,पारंपारिक वेशभूषा केलेल्या महिला त्याचबरोबर  विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ साळे मॅडम यांना आज अखेर वेगवेगळ्या स्तरावरील 10 पुरस्कार मिळाल्याबद्दल,सौ कुंभार मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल यांचाही शाल श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद मराठी शाळेतील लहान मुलींनी पारंपारिक वेशभूषा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.उपस्थित सर्वच महिलांना भोजनासह आकर्षक भेटवस्तू ग्रामपंचायतीचे वतीने देण्यात आली.या कार्यक्रमांमध्ये आजच ज्यांचा वाढदिवस आहे अशा  शाळेतील शिक्षिका सौ.सुनिता एडके  माजी पंचायत समिती सभापती सौ मायाताई एडके यांचा वाढदिवस ही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुष्पा पाटील,पंचायत समिती तासगाव माजी सभापती सौ मायाताई एडके,सौ रामेश्वरी पाटील,सौ सुजाता पाटील,सौ अर्चना गेंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत महिला सदस्या,सरपंच,  उपसरपंच,सदस्य,ग्रामस्थ,महिलावर्ग  विद्यार्थी,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.