प्रतिष्ठा न्यूज

ग्राहक पंचायत महाराष्ट्र गगनबावडा तालुका शाखा स्थापन

प्रतिष्ठा न्यूज/ तुकाराम पडवळ
गगनबावडा, ता.२ : ग्राहक पंचायत महाराष्ट्र गगनबावडा तालुका शाखा स्थापन झाली असून भास्कर माने अध्यक्षपदी तर तुकाराम पडवळ (पत्रकार) यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी कार्यकारिणीची नावे जाहीर केली. अध्यक्षस्थानी राज्य सचिव आणि सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख प्रा. एस एन पाटील होते.
समारंभाच्या प्रमुख अतिथी गगनबावडयाच्या गटविकास अधिकारी माधुरी परीट होत्या. त्यांच्या हस्ते नाम फलकाचे उद्घाटन झाले. व निवडीची पत्रे ही देण्यात आली. तसेच महा आवास अभियान मध्ये गगनबावडयाचा राज्यात दुसरा क्रमांक आल्याबद्दल त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.त्या म्हणाल्या, ” ग्राहकाचे अज्ञान, संघटनाचा अभाव, ग्रामीण नागरिकांना जास्त फसवले जाते, तसेच सुशिक्षितानाही फसविले जाते. ही फसवणूक थांबवण्यासाठी, ग्राहकाने ग्राहकानी सजग राहण्यासाठी, निष्ठावान कार्यकर्त्यांची गरज असते. ती या संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. ”
जिल्हाध्यक्ष बी जे पाटील यांनी आपल्या ग्राहक चळवळीतील ३५ वर्षाचे अनुभव कथन केले. तसेच संस्थेचे वटवृक्षात कसे रूपांतर झाले याबाबत सांगितले. ग्राहकांच्या समस्या बाबत, अन्याय विरुद्ध झगडनेस माझा सदैव पाठिंबा राहील. असे सांगितले.
तालुक्याचे सुपुत्र,राज्य सदस्य, व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रा. सुरेश पाटील म्हणाले, ” माझ्या तालुक्यात शाखा नाही याची खंत सदैव वाटत होती. ती आज पूर्ण झाली असून संवाद व समन्वयात ग्राहक कल्याण आहे हे समजून घेतले पाहिजे. कार्यशाळा, मेळावे घेऊन ग्राहकात जागृती केली जाईल. ग्राहक हा खऱ्या अर्थाने राजा होण्यासाठी ग्राहकांनी संघटित होणे महत्त्वाचे असते. ग्राहक संरक्षण कायद्याने प्राप्त झालेले हक्क, अधिकार आणि कर्तव्यकडे दुर्लक्ष यामुळे ग्राहकांची फसवणूक अडवणूक होत आहे. म्हणून ग्राहक राजा जागृत करण्याच्या उद्देशाने गगनबावडा शाखा स्थापन करण्यात आल्याचे सांगितले.
इतर नवनिर्वाचित कार्यकारणी पुढीलप्रमाणे
संघटक गुरुनाथ कांबळे, सह संघटक पांडुरंग जाधव, सह संघटक( स्त्री ) डॉ. मेघा राणी जाधव, सचिव विलास पाटील, सहसचिव सरदार पाटील, कोषाध्यक्ष राजेंद्र कांबळे, प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत पाटील ( पत्रकार) सल्लागार आनंदा पाटील, सल्लागार तानाजी पाटील, सदस्य नामदेव चौधरी.
या बैठकीस प्रमुख उपस्थिती जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर भदर्गे, जिल्हा संघटक संघटक सुरेश माने, पन्हाळा तालुका अध्यक्ष बाजीराव निकम, यांनी आपापली मनोगते व्यक्त केली. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष भास्कर माने, सह संघटक डॉ. मेघा राणी जाधव, सहसचिव सरदार पाटील, संघटक गुरुनाथ कांबळे, रवी सुतार, पठाण यांनी आपापले विचार मांडले.
या बैठकीला गजानन वापीलकर, रघुनाथ पाटील, संभाजी सुतार( पत्रकार,) बाजीराव तळेकर (पत्रकार,) भिवाजी कांबळे, स्वप्निल वरेकर, नंदा रोकडे, रवी सुतार, पठाण आधी शंभर वर कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रस्ताविक व सूत्रसंचालन सुरेश माने यांनी केले. तर आभार प्रदर्शन सरदार पाटील यांनी मानले. 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.