प्रतिष्ठा न्यूज

कुंडल-विटा रस्ता आणखी किती बळी घेणार : ॲड दिपक लाड; रस्ते विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर ७२ तासात ४ दुर्दैवी बळी

प्रतिष्ठा न्यूज
कुंडल प्रतिनिधी : कुंडल-विटा रस्त्यावर स्पीड ब्रेकरची जागा, कोण ठरवतो? हा संशोधनाचा विषय बनला आहे. *रस्त्यावर गतिरोधक नसल्याने कुंडल-विटा रोडवर*
*रस्ते विभागाच्या दुर्लक्षामुळे कुंडल येथे ७२ तासात ४ दुर्दैवी बळी गेले आहेत*  कुंडल व परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

रस्ते विभाग आणखी किती बळी घेणार असा संतप्त सवाल रणसंग्राम सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी उपस्थित केला.

कुंडल साठेनगर सारखा अति वरदळीचा रस्ता  हा मृत्यूचा सापळा बनला आहे.

आजवरची परिस्थिती पाहिली तर
स्पीड बेकर नसल्यामुळे साठेनगर ठिकाणी शेकडो गंभीर अपघात झाले आहेत.

रस्त्यावर स्पीड ब्रेकर उभारण्याबाबत निकष ठरवले गेले आहेत.. स्पीड ब्रेकर उभारल्यावर त्यावर  प्लास्टिक पेंट पट्ट्या ,पांढरे पट्टे काढणे आवश्यक आहे शिवाय वाहन चालकांना समजण्यासाठी चाळीस मीटर आधीच सूचनाफलक ही असणे अपेक्षित आहे… गतिरोधक उभारताना  गतिरोधकाची उंची व लांबी याचेही निकष दिले आहेत.

परंतु हे निकष कागदावरच आहेत…

कुंडल- विटा रोडवर वरदळीच्या ठिकाणी गतिरोधक वाढवणे गरजेचे आहे… कुंडल साठेनगर येथे गतिरोधक नसल्याने आजचे दोन दुर्दैवी अपघातामधील मोटरसायकल स्वारांचा जाग्यावरच मृत्यू झाला.
रणसंग्राम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष ॲड दिपक लाड यांनी विघ्नहर्ता ॲम्बुलन्स चे भरत शिरतोडे यांना फोनवरून अपघाताची माहिती कळवताच अवघ्या काही मिनिटात रुग्णवाहिका आली.
पुढे प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडल येथील कार्यवाहीसाठी दाखल झाली.

कुंडल साठेनगर बुधवारी रात्री झालेल्या अपघातामधील चिंचणी (अंबक) दोन तरुण मयत होऊन ७२ तास उलटले नाहीत तोपर्यंत काळीज हेलावणारे आज
शुक्रवार दुपारचे दरम्यान
कुंडल-विटा रोडवरील मोटारसायकल अपघातातील दोन बळी काळीज हेलावणारे आहेत.

रस्ते विभागावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नोंद करू नये अशी संतप्त भावना प्रवाशांच्यामधुन उमटली आहे असे ॲड दिपक लाड यांनी कळविले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.