प्रतिष्ठा न्यूज

अंनिसच्या वतीने न्यायमूर्ती हेमंत गोखले यांचे व्याख्यान

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी सायं. ६ वा. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती मा. न्या. हेमंत गोखले यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बंधुत्वाविषयीचे विचार’ या विषयावर ऑनलाईन व्याख्यान आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र अं. नि. स. च्या राज्य अध्यक्ष मा. सरोजमाई पाटील या असतील. या प्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन न्यायमूर्ती गोखले यांचे हस्ते होईल. हे व्याख्यान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या फेसबुक पेज वरुन लाईव्ह पाहता येईल. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अंनिसच्या वतीने राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण आणि राहुल थोरात यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.